प्रोझोन मॉलजवळ सुसाट मोटारसायकलीने इलेक्ट्रिक स्कुटीस्वाराला उडवले, बोडखे इंटरप्रायजेसचे मॅनेजर जखमी बातमीची लिंक कमेंटमध्ये…
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) :
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
प्रोझोन मॉलजवळ सुसाट मोटारसायकलस्वारांनी इलेक्ट्रिक स्कुटीस्वारांना उडवले. यात स्कुटीस्वार राजेश अरविंद पांडे (वय ५६, रा. सहयोगनगर, अर्जुन अपार्टमेंट, गारखेडा परिसर) जखमी झाले आहेत
पांडे हे चिकलठाणा पोलीस ठाणे येथून पोलीस अधीक्षक कार्यालय येथे इलेक्ट्रिक स्कुटरने (MH 20 GY 5730) जात होते. सोबत कार्यालयातील सहकारी जोडीदार रविशंकर धुमाळ होते. सव्वा बाराला प्रोझोन मॉलकडून गरवारेकडे जाणाऱ्या रोडवर अचानक एन १ सिडकोमधून MSEB कार्यालयाजवळ एका मोटारसायकलस्वाराने डाव्या बाजूने येऊन त्यांना जोरात धडक दिली. यात पांडे यांच्या डाव्या पायाला मार लागून दोघेही पडले. मोटारसायकलवर चालवणारा अनिकेत सांडू खाडे (वय ३५, रा. बाळापूर छत्रपती संभाजीनगर) व मागे श्रीकृष्णा सांडू खाडे (वय ३३, रा. बाळापूर) हे बसलेले होते. दोघेही मोटारसायकल घेऊन पळुन गेले. रविशंकर धुमाळ यांनी पांडे यांना राज्य कामगार विमा हॉस्पिटलमध्ये आणले. तिथून मिनी घाटीत येऊन पांडे यांनी उपचार घेतले. पांडे यांच्या डाव्या पायाला ३ टाके पडले आहेत. त्यानंतर पांडे यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार अरविंद मेने करत आहेत.