कारखान्यातील भीषण स्फोटाने 10 गावांमध्ये हादरा: एकाचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी, नागपुरात खळबळ
कारखान्यातील भीषण स्फोटाने 10 गावांमध्ये हादराः एकाचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी, नागपुरात खळबळ
Nagpur News: सोलर एक्सप्लोसिव्ह लिमिटेडच्या
कारखान्यात भीषण स्फोट झाला असून या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील बाजारगावात मध्यरात्री झालेल्या या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटाचा आवाज अनेक गावांमध्ये ऐकू आला.
स्फोटाचा आवाज एवढा प्रचंड होता की त्याचे हादरे बाजारगावसह शिवा, सावंगा आणि आसपासच्या दहा गावांत जाणवले. घाबरलेल्या नागरिकांनी मध्यरात्री घराबाहेर धाव घेतली. स्फोटानंतर कारखान्यातील लाखो रुपयांची यंत्रसामग्री व साहित्य जळून खाक झाले. नागपूर-अमरावती महामार्गालगत असलेल्या या युनिटमध्ये ग्रेनेड, ड्रोन्स आणि विविध स्फोटके तयार केली जातात. त्यातीलच PP-15 प्लांटमध्ये रात्री 12:34 वाजता ही दुर्घटना घडली.
प्लांटमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सदर दुर्घटनेत आणखी नऊ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. मध्यरात्री झालेल्या या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, स्फोटानंतर महामार्गावर मलबा उडाला.
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथे गुरुवारी पुन्हा एकदा कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सोलर एक्सप्लोसिव्ह लिमिटेडच्या T-15 प्लांटमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सदर दुर्घटनेत आणखी नऊ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. मध्यरात्री झालेल्या या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, स्फोटानंतर महामार्गावर मलबा उडाला.