Sunday, October 5, 2025
Homeक्राईमशाळेत काम करणाऱ्या महिलेवर ग्रा.पं. लिपिकाचा दोनदा लैंगिक अत्याचार!; चिकलठाणा परिसरातील धक्कादायक...

शाळेत काम करणाऱ्या महिलेवर ग्रा.पं. लिपिकाचा दोनदा लैंगिक अत्याचार!; चिकलठाणा परिसरातील धक्कादायक घटना

 

शाळेत काम करणाऱ्या महिलेवर ग्रा.पं. लिपिकाचा दोनदा लैंगिक अत्याचार!; चिकलठाणा परिसरातील धक्कादायक घटना

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर  शहराजवळील झाल्टा ग्रामपंचायतीच्या लिपिकाने एका शाळेत काम करणाऱ्या ३१ वर्षीय महिलेवर दोनदा लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिकलठाणा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

 

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शहराजवळील झाल्टा ग्रामपंचायतीच्या लिपिकाने एका शाळेत काम करणाऱ्या ३१ वर्षीय महिलेवर दोनदा लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिकलठाणा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

 

रेवणनाथ कारभारी शिंदे (रा. झाल्टा) असे संशयिताचे नाव आहे. कामाच्या माध्यमातून महिला आणि रेवणनाथची ओळख झाली होती. शाळेच्या कामाचे निमित्त करून त्याने नोव्हेंबर २०२४ मध्ये महिलेला ग्रामपंचायत कार्यालयात बोलावले. तिथे तिच्यासोबत अश्लील चाळे करत लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. बदनामी होईल म्हणून महिलेने याबाबत कुणाला सांगितले नाही. मात्र त्यामुळे रेवणनाथची हिंमत वाढून तो गेल्या २९ ऑगस्ट रोजी महिलेच्या घरी आला. महिलेला एकटी पाहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. गेल्या ४ सप्टेंबरला त्याने पुन्हा तिच्या घरी येत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले.

 

बदनामी होईल म्हणून महिलेने याबाबत कुणाला सांगितले नाही. मात्र त्यामुळे रेवणनाथची हिंमत वाढून तो गेल्या २९ ऑगस्ट रोजी महिलेच्या घरी आला. महिलेला एकटी पाहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. गेल्या ४ सप्टेंबरला त्याने पुन्हा तिच्या घरी येत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले.

 

बदनामीपोटी महिला कुणाला सांगत नव्हती. मात्र ४ सप्टेंबरला पुन्हा लैंगिक अत्याचार झाल्याने तिने भावाला सांगितले. त्यानंतर तिच्या भावाने रेवणनाथला जाब विचारला असता दोन्ही कुटुंबात हाणामारी झाली. नंतर महिलेने चिकलठाणा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी रेवणनाथविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. रेवणनाथ गावात दहशत माजवत असतो. ग्रामपंचायतीच्या सर्व कामांतही त्याचा हस्तक्षेप असतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सहायक पोलीस निरीक्षक समाधान पवार यांनी सांगितले, की त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच अटक केली जाईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments