गनिमी कावा…..समाजाचे प्रामाणिक सर्वोत्तम आंदोलक मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सदैव सोबत.
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क महाराष्ट्र
दोनदा फसवणाऱ्या सरकार ला पुन्हा एकदा गुडघ्यावर आणू. वाशीत डाव फसला. अन यावेळी आझाद मैदानात सुद्धा हैदराबाद ग्याझेट च्या नावाने चुकीचा जीआर देऊन सरकार ने फसवले. देवेंद्र फडणवीस साहेब ओबीसीचे काढून दिले नाही म्हणतात, अन विखे पाटील साहेब दिले म्हणत आहेत. म्हणजे सरकार स्वतः संभ्रमात आहे. येवढा मोठा निर्णय घेऊन देवेंद्र फडणवीस हे स्वतः आझाद मैदानात आले नाहीत, याचा अर्थ त्यांनी मराठ्यांच्या कोपराला गूळ लावला हे निश्चित. सरकार च्या सांगण्यावरून भुजबळ उगाच नाराज नाही? मराठ्यांनी दोन वर्षात जे मिळवले ते फक्त पुढे वाचा.
शिंदे समिती ला मराठवाड्यातील ८५०० गावांपैकी केवळ १५०० गावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत. उरलेल्या ७००० गावांमध्ये एकही नोंद सापडली नाही. तेथील मराठ्यांना सदर जीआर मधून आरक्षण कसे देणार? हे स्पष्ट होत नाही. याचा अर्थ ग्याझेट लावतो म्हणून यांनी आपल्याला चुना लावला आहे.
सरकार प्रामाणिक आंदोलकांना किती फसवते? याचे अजून एक उदाहरण म्हणजे ५८ लाख नोंदी. विदर्भ, उत्तरमहाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील जुन्याच नोंदी मिसळून आपल्याला सरकार ने ५८ लाख नोंदी दिल्याचे सांगितले. त्यावरून आम्ही म्हणालो की ३ कोटीच्या वर मराठे ओबीसी आरक्षणात गेले.
पण प्रत्यक्षात आंदोलन सुरू झाल्यापासून मराठवाड्यात केवळ ४७ हजार नोंदी सापडल्या. त्यावरून अडीच लाखाच्या आसपास प्रमाणपत्र काढले गेले. विशेष म्हणजे त्यापैकी केवळ फक्त पाच हजार च्या आसपास लोकांचीच व्हॅलिडिटी झाली. अशी माहिती समोर येत आहे. म्हणजे मागचे दोन वर्षे दादांच्या तोंडून कितीतरी वेळा ३ कोटी मराठे ओबीसीत गेल्याचे बोलले गेले. त्याचे काय ?
याचा अर्थ दोन कोटींची सभा घेऊन, वारंवार उपोषणे करून, करोडो रुपयांची धूळधाण करून, दादांच्या शरीराची चालण करून आम्हाला मिळाले काय? तर पाच हजार वॅलिडिटी , अन काही हजार प्रमाणपत्र. तेही शिंदे समिती ने जेवढे दिले तेवढे. तीसच्या वर आत्महत्या झाल्या त्याची कसलीही चाड सरकारला नाही. सरसकट कुणबी साठी आमचा सुरुवातीचा वर्ष गेला, त्यांनतर सगेसोयरेत पाच सात महिने गेले. त्या दोन्ही गोष्टी सरकार ने पूर्ण केल्या नाहीत. आता ग्याजेट साठी मुंबईत गेलो तरी रिकाम्या हाताने पाठवले? हे काही सरकार ने बरोबर केले नाही.
दादा सरळ माणूस आहे. पण हे लोक चुकीची माहिती देतात . त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. म्हणून माझा ठाम विश्वास आहे की सरकार आपल्याला नेहमी फसवत आले आहे
मराठ्यांची मुंबईवर तीसरी धडक सरकारला परवडणार नाही. एकदा पेरणी फेल गेली तर दुबार पेरणी करू, दुसऱ्यांदा पिक नाही वापले तर तिबार पेरणी करू. कारण आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत. आम्हाला अपयशाची सवय आहे. पुढच्या वेळी कायद्याचा अभ्यास करून, संविधानाच्या चौकटीत बसणारी ५०% च्या आतली ओबीसी आरक्षण ची एकमेव मागणी घेऊन येऊ. तेही मनोज दादांच्याच नेतृत्वात
माझ्या दृष्टीने समाजाची एकी सर्वात महत्वाची आहे.
adv योगेश केदार
9823620666
