वाळुज विशेष दसऱ्यानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना वाळूज परिसरातील लिंबे जळगाव येथे 2 ऑक्टोबर रोजी दुपारी अंदाजे एक ते दीड वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती समोर येत आहे
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क वाळूज
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंबे जळगाव शिवारातील शेतात राहणाऱ्या कुटूंबातील इमरान इसाक शेख वय 20 वर्षे हा दसऱ्यानिमित्त 2 ऑक्टोबर रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास शेतालगत असलेल्या टेम्भापुरी धरणाच्या पाण्यात ट्रॅक्टर धुण्यासाठी गेला असता. त्याच्या सोबत त्याचे कुटुंबातील इमरान, इसाक पठाण वय 10 वर्षे, जैन बाबू पठाण वय 10 वर्षे व घराशेजारील मुलगा गौरव दत्तू तारक वय 10 ही तीन लहान मुले होती. सर्व चौघांचाही ट्रॅक्टर धुताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे.
बुडालेल्या चारही मुलांनी चे मृत्यू देह पाण्याबाहेर काढण्यात आलेले असून त्यांना टोल नाक्याजवळ हॉस्पिटल येथे नेण्यात आले व नंतर तेथून घाटी रुग्णालयात रवाना केले आहेत. या घटनेची माहिती मिळताच वाळूज ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्वरीत घटना स्थळी उपस्थित झाल्याची माहिती ही मिळत आहे
त्यानंतर पाण्यात बुडालेल्या चौघांचाही मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह पोस्टमार्टम साठी घाटीत दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी व तपासणी सुरू आहे
लिंबे जळगांव येथे चार मुले डोहात बुडाली, ट्रॅक्टर धुण्यासाठी घराबाहेर पडली होती एकच कुटुंबातील तिघे, तर एक घराचा एकुलता एक मुलगा 😢
RELATED ARTICLES