मनपा प्रियदर्शनी विद्यालयास आयडीबीआय बँकेकडून सी एस आर मधून दोन लाख रुपयांचे कपाटे
दि.०३ ऑक्टोबर
छत्रपती संभाजीनगर दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
मनपा प्रियदर्शनी विद्यालयात आज आयडीबीआय बँकेच्या वतीने सीएसआर फंडामधून दोन लाख किमतीचे 15 गोदरेज कपाटे भेट देण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मां.अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, प्रमुख अतिथी उपायुक्त अंकुश पांढरे ,शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे, आयडीबीआय बँकेचे जेष्ठ विभागीय प्रमुख पुनीत गोस्वामी, जनरल मॅनेजर विनोद मदनानी व अनिरुद्ध त्रिभुवन, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे, हे होते.
कार्यक्रमाचे संचालन तेजस्विनी देसले यांनी केले प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी शाळेमध्ये सीएसआर फंडातून वेगवेगळ्या कंपन्यांकडून मिळवलेल्या साहित्याची माहिती दिली.
आज संजीव सोनार यांचा वाढदिवस असल्यामुळे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या हस्ते केंद्र अंतर्गत शाळांना कपाटांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी आर राठोड, शशिकांत उबाळे, रश्मी होनमुटे, पूजा सोनवणे,प्रकाश इंगळे, काकासाहेब जाधव,, सचिन लवेरा, प्रशांत निकाळजे, हर्ष नरवडे, बाळासाहेब जाधव, यांनी परिश्रम घेतले.