राकेश किशोर याच्या निवासस्थानी जाऊन निलेश लंके यांनी संविधानाची प्रत आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र भेट दिले.

0
FB_IMG_1760017193016

संविधानाचा अपमान म्हणजे भारताच्या आत्म्याचा अपमान!

 

सन्माननीय सरन्यायाधीश मा.भूषणजी गवई यांच्यावर बूट फेकण्याची घटना ही केवळ एका व्यक्तीचा अवमान नसून — तो भारतीय संविधान, न्यायव्यवस्था आणि देशाच्या लोकशाही मूल्यांचा अवमान आहे.

 

   राकेश किशोर याच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निलेश लंके यांनी संविधानाची प्रत आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र भेट दिले.

 

दिल्ली:दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

ज्यांच्या हातात कायद्याचे ज्ञान आहे, त्यांनीच जर अशा प्रकारे असंविधानिक वर्तन केले, तर समाजात चुकीचा संदेश जातो.

आपण सर्वजण आज जे स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि अधिकार उपभोगतो, ते या संविधानामुळेच शक्य झाले आहे.

 

मी राकेश किशोर यास सांगितले की, “आपण संविधानाचे रक्षण केले पाहिजे. त्यासाठी बूट उचलण्याची गरज पडत नाही तर विचाराने चालण्याची आवश्यकता आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि संविधानाचे तत्व हीच खरी मानवी मूल्ये जपण्याची शस्त्रे आहेत.”

 

मा.सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावर झालेल्या या अवमानकारक कृत्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो.

संविधान आणि लोकशाही रक्षणासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे, ही माझी भूमिका आहे.

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेले संविधान हे भारताचे हृदय आहे —

ते धडधडत राहिले, तरच भारत जिवंत राहील.

 

#संविधानसर्वोच्च #BharatKaSamvidhan #NileshLanke #DrAmbedkar #JusticeForDemocracy #भूषणगवई #लोकशाहीचा_सन्मान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *