मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

मोठी बातमी…! ‘या’ आमदाराची राष्ट्रवादीतून हकालपट्टी होणार? पक्षाने नोटीस पाठवली

On: October 11, 2025 4:34 PM
Follow Us:
---Advertisement---

 

 

आमदाराची राष्ट्रवादीतून हकालपट्टी होणार? पक्षाने नोटीस पाठवली

पुणे दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

पुणे : सोलापूर येथे हिंदू संघटनांनी काढलेल्या आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी यंदाच्या दिवाळीत हिंदूकडूनच खरेदी करा असे वादग्रस्त विधान केले. या विधानामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून आमदार संग्राम जगताप यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असून पक्षाकडून त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे.

 

पुणे दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. संग्राम जगताप यांनी अतिशय चुकीचे विधान केले आहे. त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवली जाईल, असं अजित पवार यांनी म्हटले आहे.

 

पक्षाची विचारधारा आणि ध्येय-धोरणे निश्चित झाल्यानंतर कोणत्याही खासदार, आमदार किंवा जबाबदार व्यक्तीने अशी वक्तव्ये करणे पक्षाला मान्य नाही. जेव्हा अरुण काका जगताप हयात होते, तेव्हा सर्व काही सुरळीत होते. आता संग्राम यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांनी जबाबदारीने वागावे आणि बोलावे. असंही अजित पवारांनी यावेळी म्हंटल

 

पवार यांनी यापूर्वीही एका कार्यक्रमात जगताप यांना बोलण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यावेळी जगताप यांनी सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यात बदल दिसत नसल्याचे पवार यांनी नमूद केले. त्यामुळे पक्षाच्या विचारांशी विसंगत असलेल्या या विधानाबाबत जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले.

 

काय म्हणाले होते संग्राम जगताप?

 

सोलापूरमध्ये झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात आमदार संग्राम जगताप यांनी ‘दिवाळी निमित्ताने बाजारपेठ आहे. सर्वांना विनंती करतो, दिवाळीची खरेदी करताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातील नफा रिटर्न फक्त आणि फक्त हिंदू माणसांनाच झाला पाहिजे. अशा प्रकारची दिवाळी हिंदूंनी साजरी करावी’ असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment