दौंडमधून सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
पुणे दौंड प्रतिनिधी अतिश जगताप
दौंड, दि. २० जुलै : दिल्लीतील जंतर-मंतर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सोनम वांगचुक आणि कोकरोच पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी व नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू केलेल्या आंदोलनाला दौंड शहरातील नागरिक तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या पक्षाच्या वतीने दौंडचे तहसीलदार तुषार बोरकर यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नीट पेपर लीक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या हितासाठी सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असून, या भूमिकेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आणि दौंडकर नागरिकांकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे.
♦
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन खरात, मनीषा संसारे, सारिका गरुड, सिमरन खवळे, रमिला कातकडे, निना जोसेफ, कंचनमाला धिंडे, कालिका कांबळे, संगीता मोरे, माधुरी ढवळे, रोहिणी ढवळे, सुनिता वांटे, जयश्री माने, थोरात मॅडम, हर्षदा पोते, तसेच शशांक गायकवाड, आनंद ओव्हाळ, दिगंबर रिकीबे, संजय आयरेल्लू, अनिकेत रणसिंग, अभय भोसले, तात्या लोंढे, कॉम्रेड अनिल धेंडे, सागर भंडारी, भीमकन्या ग्रुप दौंडचे सदस्य आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











