पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची ‘मॉडेल स्कूल’ म्हणून निवड; पदाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी
पुरंदर पुणे प्रतिनिधी दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील एखतपूर, शिवरी, बेलसर, कोथळे, भोसलेवाडी, नाझरे, मावडी सुपे, नायगाव आणि माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळांची “मॉडेल स्कूल” म्हणून निवड होणे ही तालुक्यासाठी अत्यंत अभिमानाची व गौरवास्पद बाब ठरली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकाऱ्यांसमवेत या शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आल्याची माहिती पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे यांनी दिली.
यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून शाळांसमोरील अडचणी, अपेक्षा व गरजा जाणून घेण्यात आल्या. शाळांमधील विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत तसेच विद्यार्थ्यांना आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने या सर्व शाळा लवकरच आदर्श “मॉडेल स्कूल” म्हणून विकसित करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जाणार असल्याचे सभापती अमित झेंडे यांनी सांगितले.
गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे, उपसभापती प्रवीण जगताप, पंचायत समिती सदस्य माऊली यादव, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र कुंजीर, बांधकाम विभागाचे अभियंता संतोष नलवडे,बांधकाम विभाग उपाभियंता शालिनी कोकाटे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जयदीप बुरगले,भगवान बसवदे, तसेच सदाशिव खेसे, सदाशिव चौंडकर, अर्जुन पाटोळे, दत्तात्रय कड, किशोर खळदकर, संदीप खेसे, अजिंक्य कड, अनिल शेंडगे, तुकाराम भागवत, सचिन होले, संतोष कड, सचिन कड, सोमनाथ शेंडगे, शिक्षण वर्ग, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.











