वेगाला लगाम हवा ! हिना नगर जालना रोड वर स्पीड ब्रेकर बसवा
वेगाला लगाम हवा !
- हिना नगर जालना रोड स्पीड ब्रेकर बसवा
हिना नगर-जालना रोड मार्गावर वाहनांचा वेग प्रचंड वाढलेला असून नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व पादचारी यांचा रोजचा वावर असलेल्या या मार्गावर तत्काळ स्पीड ब्रेकर बसवणे अत्यावश्यक आहे.
संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ताबडतोब उपाययोजना करावी, ही जोरदार मागणी.
चिकलठाणा प्रतिनिधीः हिना नगर जालना हा मुख्य रस्ता सध्या वाहनांच्या जीवघेण्या वेगामुळे ‘मृत्यूचा सापळा’ बनत चालला आहे. या मार्गावरील विविध गावांच्या बस्ती भागातून जाणाऱ्या बाहनांचा वेग अनियंत्रित असल्याने शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, अपघाताची बाट न पाहता संबंधित तत्काळ गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्यात यावेत, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते आजमत पठाण यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सविस्तर निबेदन सादर केले आहे. गेल्या काही वर्षांत हिना नगर जालना रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने बाहनांच्या संख्येत आणि बेगात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, गावांच्या हद्दीतून जातानाही बाहनांचा वेग कमी होत नसल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. विशेषतः शाळा, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची या सत्यावर मोठी वर्दळ असते, भरधाव वाहनांमुळे
