हजरत बाहोद्दीन बाबा दर्गाह जवळील पिरबादी पुलाला कठडे नाही, दुर्गंधीचा वास नागरिकांचा जीव धोक्यात
हजरत बाहोद्दीन बाबा दर्गाह जवळील पिरबादी पुलाला कठडे नाही, दुर्गंधीचा वास नागरिकांचा जीव धोक्यात
फुलंब्री शहरातील फुलमस्ता नदीतील प्रकरण
फुलंब्री प्रतिनिधी सरफराज पटेल
फुलंब्री शहरातील हजरत बाहोद्दीन बाबा दर्गाह जवळील पिरबादी पुला जवळील फुलमस्ता नदी च्या पुला जवळ दुर्गंधीचा वास येत आहे. तसेच फुलंब्री शहरातील ड्रेनेज चा पाणी फुलमस्ता सोडण्यात येत असल्याने शहरातील नागरिकांचा आरोग्य धोक्यात आला आहे.
गेल्या काही वर्षापासुन ड्रेनेज लाईन चा पाणी फुलमस्ता नदीत सोडण्यात येत असल्याने नदीचा दुषीत पाणी होत आहे आणि तो पाणी सरळ फुलंब्री च्या तलाव मध्ये जात आहे. यात तोच पाणी शहरातील नागरिकांना येतो अशामध्ये लहान मुले मुली, वयोवृद्ध नागरिकांचा आरोग्य धोक्यात आला आहे असे सांगितले जात आहे.
याबाबत फुलंब्री नगरपंचायतीच्या संबंधित अधिकार्यांना सांगितले असता तर त्यांनी दुर्लक्ष केले आहे. तसेच
हजरत जमाल शहा बाबा दर्गाह जवळ बाजार पट्टी परिसरात उघड्यावर नाल्या आहे तेथील नागरिकांना मच्छर डास डसत आहे, गोरगरिब समाजातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या वर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी लक्ष देत उघड्यावरील नाल्याचा बंदोबस्त करावे अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे.
*पिरबादी पुलावर व सोसायटी परिसरातील पुलावर दोन्ही बाजुच्या कठड्यावर लोखंडी पाईप किंवा जाळी टाकावी*
फुलंब्री नगरपंचायतीच्या हद्दीतील फुलमस्ता नदी जवळील हजरत बाहोद्दीन बाबा दर्गाह जवळील पिरबादी पुलावर दोन्ही बाजुच्या कठड्यावर लोखंडी पाईप किंवा जाळी टाकावी जेणे कोणतीही जीवीत हानी होणार नाही.
या ठिकाणी खुप मोठा गड्डा आहे, खोलवर पाणी आहे, पुला वर मातीचा ढिगार पडलेला आहे.
मागे काही दिवसांपुर्वी एक दुचाकी धारक पुलावरुन पाण्यात पडला होता, पण कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
पण दुचाकीची नुकसान झाली होती, तसेच या पुलावरुन शहरातील फकीर मोहम्मद उर्दू शाळा , भारत माता शाळा , संत सावता माळी गुरुकुल शाळा , वानखेडे शाळा या शाळेत लहान मुले मुली जातात परंतु या पिरबादी पुलावरुन लहान मुले मुली जातात एखाद्या मुलांने डोकवले तर त्याचा जीव जाऊ शकतो.
म्हणून या करिता नगरपंचायतीच्या संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी लक्ष देत हा प्रश्न सोडावा. अशी मागणी नागरिक करत आहे.
प्रतिक्रिया #
*पिरबादी पुलाजवळ घाण पाणी साफ करावे, ड्रेनेज चा पाणी बंद करावे*
सध्या मी वार्ड क्रमांक 9 मध्ये राहतो, फुलंब्री शहरातील बाजार पट्टी परिसरात दुर्गंधी वास येत आहे, फुलमस्ता नदीत ड्रनेजचा पाणी सोडण्यात येत आहे, तेच पाणी फुलंब्री च्या तलाव मध्ये जात नंतर तोच पाणी नळाने शहरातील नागरिकांना येतो अशामध्ये नागरिकांचा आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच पिरबादी पुलावर लोखंडी पाईप किंवा जाळी टाकावी जेणे कोणतीही जीवीत हानी होणार नाही.
नागरिक ” शाकेर इसाक पटेल” राहणार फुलंब्री जिल्हा औरंगाबाद
फुलंब्री नगरपंचायतीचे अधिकारी व माजी लोकप्रतिनिधींनी काही नाही केले
फुलंब्री शहरातील हा ज्वलंत प्रश्न आहे, नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे, फुलंब्री नगरपंचायत मध्ये एका पक्षाच्या नेत्यांची सत्ता होती त्यांनी काहीच केले नाही.
सरफराज पटेल पत्रकार फुलंब्री जिल्हा औरंगाबाद
