मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

अजितदादांच्या अपघातामागे महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा हात आहे रोहित पवारांचा आरोप पटतो का?

On: February 21, 2026 9:10 PM
Follow Us:
---Advertisement---

रोहित पवार यांनी यावेळी पायलट नैराश्यात होता आणि तो आर्थिक अडचणीत होता अशी माहिती सांगितली. ते असे देखील म्हणाले की,’विमानात अतिरक्त इंधन ठेवण्यात आले होते. या अतिरिक्त इंधनामुळे स्फोट झाला. ब्लाकबॉक्सबाबत दिशाभूल केली जात आहे. ब्लॅकबॉक्सबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. डीजीसीएचे अनेक मोठे अधिकारी व्हीएसआर कंपनीला मदत करत आहेत.’

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला २५ दिवस पूर्ण झाले. या अपघाताचा तपास सुरू आहे पण अद्याप हा विमान अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण समोर आले नाही. हा विमान अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार rohit pawar यांनी अजित पवार ajit pawar यांच्या विमान अपघाताबाबत आतापर्यंत अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी यासंदर्भात मुंबईत दोन पत्रकार परिषद घेतल्या होत्या.

 

आज त्यांनी थेट दिल्लीमध्ये तिसरी पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. दिल्लीतील शरद पवार sharad pawar यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी VSR कंपनीला अनेक राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू ram mohan nayadu यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

 

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली. ते म्हणाले की, ‘व्हीएसआर कंपनीबाबत अनेक तक्रारी आहेत. व्हीएसआर कंपनीच्या मागे मोठी लोकं आहेत.

 

या कंपनीला बड्या राजकीय नेत्याचा पाठिंबा असून या कंपनीला वाचवले जात आहे. केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांचा राजीनामा घेतला जावा. चौकशी पूर्ण होईपर्यंत नायडूंना पदावरून दूर करावे

 

रोहित पवार यांनी म्हटले आहे की या अपघाता मागे महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचा हात आहे. त्यामुळे तो बडा नेता कोण अशी चर्चा रंगली आहे.

 

राहुल गांधींनी rahul gandhi लक्ष घालून आमचा विषय मांडावा असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे. त्यांनी पुढे असे ही सांगितले की, ‘विमातळावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी करूनही ते देण्यास नकार देण्यात आला. डीजीसीए आणि चौकशी समिती काय करत आहेत? सीआयडीने अद्याप एकही अहवाल दिला नाही. १५ तारखेला येणारा अपघाताचा अहवाल अद्याप आला नाही विमानतळ प्रशानस भाजपच्या ट्रोलर्सला का माहिती देत आहे. डीजीसीएचे DGCA मोठे अधिकारी व्हीएसआर कंपनीला मदत करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी narendra modi, गृहमंत्री अमित शहाच amit shah अजित पवारांना न्याय मिळवून देऊ शकतात.

 

तर महाराष्ट्रातील तो बडा नेता कोण असेल?

आणि रोहित पवार यांनी केलेले हे आरोप आपणास पटतात का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment