मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेवर आक्षेप; प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी

On: April 2, 2026 1:51 PM
Follow Us:
---Advertisement---

 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेवर आक्षेप; प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेवर आक्षेप; प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी

 

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या १० नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून, ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप करत ती तातडीने स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात किशोर भिकनसिंग राजपूत यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी आक्षेप अर्ज दाखल केला आहे.

काय आहे मुख्य आक्षेप?

अर्जदार किशोर राजपूत यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की, महानगरपालिकेने १३ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीर सूचनेनुसार नामनिर्देशित सदस्यांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, ही प्रक्रिया ‘महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१२’ मधील नियम क्र. ३ चे उल्लंघन करणारी आहे.

नियम क्र. ३ नुसार: महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर, निकालाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत पहिल्या सभेमध्ये या नियुक्त्या होणे बंधनकारक आहे. मात्र, सध्याची प्रक्रिया या नियमात बसत नसल्याचा दावा अर्जात करण्यात आला आहे.

प्रक्रिया तातडीने स्थगित करण्याची विनंती

नगरसचिव विभाग आणि संबंधित प्रशासनाने कायदेशीर तरतुदींचे पालन न केल्यामुळे नामनिर्देशित सदस्यांचा कार्यकाळ कमी झाला असून ही प्रक्रिया नियमांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे:

* जोपर्यंत राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट अभिप्राय घेतले जात नाहीत, तोपर्यंत ही प्रक्रिया स्थगित करावी.

* आयुक्तांनी आणि महापौरांनी या नियमावलीचा फेरविचार करावा.

न्यायालयात धाव घेण्याचा इशारा

महानगरपालिका प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल न घेतल्यास आणि ही बेकायदेशीर प्रक्रिया सुरूच ठेवल्यास, याविरोधात माननीय न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही किशोर राजपूत यांनी दिला आहे.

या अर्जाच्या प्रती माहितीसाठी महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त आणि महापौरांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आता महानगरपालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष

लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

रोपळेकर चौक बॅग स्नेचिंग प्रकरण: जवाहरनगर पोलिसांची धडक कारवाई; आरोपी १२ तासांत गजाआड, ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

Leave a Comment