मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

खास गेटचा इतिहास पुसला; मोकळ्या जागेवर बेकायदेशीर चक्क मोठी इमारत बांधली

On: April 4, 2026 2:03 AM
Follow Us:
---Advertisement---

खास गेटचा इतिहास पुसला; मोकळ्या जागेवर बेकायदेशीर चक्क मोठी इमारत बांधली

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी — शहरातील जिंसी परिसरात एकेकाळी ऐतिहासिक ओळख असलेला ‘खास गेट’ हा दरवाजा आज पूर्णपणे नामशेष झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जीर्ण अवस्थेमुळे महानगरपालिकेने या परिसरातील जागा संपादित केली होती; मात्र त्यानंतर योग्य नियोजनाऐवजी अतिक्रमणाला खतपाणी घातल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

 

महानगरपालिकेच्या ताब्यात आलेल्या या मोकळ्या जागेवर काही अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीररित्या मोठे गोदाम उभारल्याचे उघड झाले आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत गेले, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

 

विशेष म्हणजे, शहराच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेला ‘खास गेट’ आज पूर्णतः अदृश्य झाला असून, त्याचा कोणताही ठसा उरलेला नाही. त्यामुळे शहराच्या सांस्कृतिक ओळखीवरच गदा आल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

स्थानिकांच्या मते, प्रशासनाने वेळेत पावले उचलली असती तर हा ऐतिहासिक ठेवा जपता आला असता. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे मनोबल वाढले असून सार्वजनिक जागेचा सर्रास गैरवापर होत आहे.

 

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच जागेचे मूळ स्वरूप पुनर्स्थापित करून ‘खास गेट’चा ऐतिहासिक वारसा जतन करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. आता महानगरपालिका प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

रोपळेकर चौक बॅग स्नेचिंग प्रकरण: जवाहरनगर पोलिसांची धडक कारवाई; आरोपी १२ तासांत गजाआड, ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

Leave a Comment