मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

गंगापूरमध्ये LPG चा मोठा काळाबाजार उघड; ३५ टन गॅससह टँकर जप्त, दोघे ताब्यात…

On: April 4, 2026 9:54 AM
Follow Us:
---Advertisement---

गंगापूरमध्ये LPG चा मोठा काळाबाजार उघड; ३५ टन गॅससह टँकर जप्त, दोघे ताब्यात…

 

सिलेंडरसाठी जनता रांगेत, तर खोजेवाडीत गॅस माफियांचा धुमाकूळ; कोट्यवधींचा साठा जप्त

 

OHPGAS

 

Hp

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

प्रतिनिधी गंगापूर ||

  1. ऐन गॅस टंचाईच्या काळात

 

MH43 K5921 १७,५१० किलो LPG

 

१९.२ किलोचे १७ भरलेले व ६ रिकामे सिलेंडर १४.२ किलोचा १ भरलेला सिलेंडर किलोचे र भरलेले सिलेंडर

 

सर्वसामान्य नागरिक सिलेंडरसाठी रांगा लावत असताना गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात घरगुती एलपीजीचा मोठा काळाबाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर ५ आले आहे. राज्यस्तरीय दक्षता पथकाने टाकलेल्या धाढीत तब्बल ३५ टनांहून अधिक LPG, दोन कैप्सूल टैंकर आणि २६ सिलेंडर जपा करण्यात आले असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खजबळ उडाली आहे.

 

एकूण ३५,२२० किलो LPG, २ टैंकर व २६ सिलेंडर असा अंदाजे १ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, पथकाच्या माहितीनुसार, या गॅसचा घरगुती वापरासाठी उपयोग केला असता २४८० कुटुंबांची गरज भागली असती. म्हणजे हजारो कुटुंबांच्या हक्काचा गैस काळ्या बाजारात वळवला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. महामार्गालगत बिनधास्त काळाबाजार सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महामार्गालगत खुलेआम टैंकर उभे करून हा धंदा सुरू होता. टैंकर आणणे, टाक्या साठवणे, मोठ्या प्रमाणावर गॅस ट्रान्सफर करणे हे सर्व दीर्घकाळ चालू असूनही प्रशासनाच्या नजरेतून कसे सुटले? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. स्थानिक सूत्रांनुसार इतक्या मोठ्या प्रमाणावरचा अवैध व्यवसाय राजकीय पाठबळाशिवाय शक्य नाही महिन्याला लाखोंची उलाढाल होत असल्याची चर्चा गुन्हेगारी सक्रिय असल्याची शक्यता लोकांच्या

 

गुप्त माहितीवर धाड रंगेहात पकडले नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार गणेश बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय दक्षता पथकाने हॉटित साईवश जवळ, मौजे खोजेवाडी शिवार, वैजापूर रोड, ता. गंगापूर येथे पहाटे अचानक छापा टाकला. धाडीदरम्यान LPG टैंकरचे सील तोडून गॅस चोरी करून व्यावसायिक टाक्यांमध्ये भरणा सुरू असल्याचे आढळले. दोन जणांना रंगेहात पकडण्यात आले. छाप्यात सापडलेले धक्कादायक चित्र कारवाईदरम्यान पुढील मुद्देमाल जप्त करण्यात आला HP कंपनीचा कैप्सूल टैंकर टोळ्या व माफिया रॅकेट

 

जीवासी घेट खेळ एलपीजी रिफिलिंग हा अत्यंत धोकादायक प्रकार असून सुरक्षा नियमांचे पालन न झाल्यास मोठा स्फोट किंवा आग लागण्याची शक्यता असते. जर अपघात झाला असता तर महामार्गावरील शेकडो नागरिकांचे जीव धोक्यात आले असते. यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

गुन्हा नोंद प्रक्रियेत “मोठे मासे” बाहेर येणार का? या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू आहे. मात्र आता सर्वांचे लक्ष एका लक्ष एका प्रश्नाकडे-

 

फक्त कामगार अडकणार की या रॅकेटमागील सूत्रधार उघड होणार?

 

गंगापूर तालुक्यातील या प्रकरणामुळे प्रशासन, राजकारण आणि गुन्हेगारी यांच्यातील संबंधांबाबत गंभीर चर्चा सुरू झाली असून पुढील कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या पूर्वीही पुणे अहमदनगर महामार्गावर भेंडाळा शिवारात अशा प्रकारचा दोन कारवाया करण्यात आल्या होत्या परंतु तिथही हा गोरखा धंदा आजही राजरोसपणे चालू आहे….

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment