मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

नाशिकः ५२ हजारांची लाच घेताना गटशिक्षणाधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात

On: April 7, 2026 9:08 AM
Follow Us:
---Advertisement---

 

नाशिकः ५२ हजारांची लाच घेताना गटशिक्षणाधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात

 

एक शिक्षक आणि नाशिक जिल्हा परिषदेतील लेखा अधिकाऱ्याला अटक

 

 

दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण (४८), नीलेश निंबा भारती (५०, प्राथमिक शिक्षक, निगडोळ, दिंडोरी) आणि जिल्हा परिषदेतील कनिष्ठ लेखा अधिकारी देविप्रसाद चैत्राम पाटील (५०) अशी संशयितांची नावे आहेत. तक्रारदार व त्यांची पत्नी दोघे शिक्षक असून ते ‘पेसा’ या विशेष कार्यक्षेत्रात नियुक्तीस आहेत. २००२ ते फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या पेसा विशेष कार्यक्षेत्रातील एकस्तर वेतनश्रेणीच्या थकीत फरकाचे देयक त्यांनी दिंडोरी पंचायत समितीला सादर केले होते.

 

या देयकाची तक्रारदाराची रक्कम ६ लाख ५७ हजार ८०८ आणि त्यांच्या पत्नीची ६ लाख ५५ हजार ६०० रुपये मंजूर करून हा प्रस्ताव जिल्हा परिषदेतील वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासाठी तक्रारदाराने पाठपुरावा केला. तेव्हा गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण आणि शिक्षक नीलेश भारती यांनी थकीत रकमेचे देयक काढण्यासाठी पडताळणी कारवाई व सापळा कारवाईदरम्यान, गटशिक्षणाधिकारी चव्हाण याने देयक सादर केल्याच्या मोबदल्यात एक टक्का रक्कम स्वीकारली.

 

नाशिक – शिक्षक दाम्पत्याच्या एकस्तर वेतनश्रेणी फरकाच्या थकबाकीचे देयक संबंधीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करणे आणि ते मंजूर करण्यासाठी ५२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षक आणि नाशिक जिल्हा परिषदेतील कनिष्ठ लेखा अधिकारी या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment