नाशिक हादरलं! त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ देवस्थानच्या अध्यक्षांवर बलात्काराचा गुन्हा दाखल; आरोपी साळुंखे फरार
विशेष प्रतिनिधी (नाशिक)
: दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आणि ‘प्रति पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल साळुंखे यांच्याविरोधात बलात्काराचा अत्यंत गंभीर गुन्हा दाखल झाला असून, यामुळे अध्यात्मिक व सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण
मिळालेल्या माहितीनुसार, एका पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप राहुल साळुंखे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी फरार; पोलिसांकडून शोध सुरू
गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी राहुल साळुंखे हा फरार झाला आहे. इंदिरानगर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत असून आरोपीचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे धार्मिक आणि वारकरी संप्रदायात मोठा धक्का बस
ला आहे.











