मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

Government Land Scam : बनावट 27 सही-शिक्क्यांचा खेळ; सरकारी जमीन लाटणाऱ्या 7 ग्रामसेवक, 8 सरपंच व 40 भूमाफियांवर कारवाईचे आदेश

On: May 10, 2026 8:04 PM
Follow Us:
---Advertisement---

 

Government Land Scam : बनावट

 

सही-शिक्क्यांचा खेळ ; सरकारी जमीन लाटणाऱ्या 7 ग्रामसेवक, 8 सरपंच व 40 भूमाफियांवर कारवाईचे आदेश

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

Jalgaon Land Scam ग्रामसेवक व सरपंचांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने हा घोटाळा उघडकीस आणला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत

 

जमीनी पुन्हा सरकारच्या ताब्यात घेणार

 

महसूल विभागाला या जमिनी पुन्हा सरकारी ताब्यात घेण्याचे आणि अतिक्रमणे काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच चौकशी समितीला सहकार्य न केल्याने गटविकास अधिकारी संजय तुकाराम मोरे यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी पिंपरी मोंढाळे येथील गट क्रमांक 140 आणि सर्व्हे क्रमांक 84 मधील सरकारी गायरान जमिनीचे बनावट नमुना नंबर 8 चे उतारे तयार केले. या बनावट उताऱ्यांवर सक्षम शासकीय अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या व शासकीय शिक्के मारून ती जमीन खासगी मालकीची असल्याचे भासवले. त्यानंतर तत्कालीन 7 ग्रामसेवक आणि 8 सरपंचांच्या संगनमताने व अधिकाराचा चुकीचा वापर करत या बोगस नोंदी चक्क ग्रामपंचायतीच्या अधिकृत दप्तरी नोंदवण्यात आल्या.

 

जमीनी पुन्हा सरकारच्या ताब्यात घेणार

 

महसूल विभागाला या जमिनी पुन्हा सरकारी ताब्यात घेण्याचे आणि अतिक्रमणे काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच चौकशी समितीला सहकार्य न केल्याने गटविकास अधिकारी संजय तुकाराम मोरे यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

विशेष म्हणजे पारोळा दुय्यम निबंधक कार्यालयाने जमिनीची मूळ मालकी न तपासता या जमिनीचे तब्बल 22 वेळा खरेदी-विक्रीचे व्यवहार नोंदवले. कागदपत्रे नावावर होताच भूमाफियांनी तिथे पक्की बांधकामे, शेततळे आणि पोल्ट्री फार्म उभारून प्रत्यक्ष कब्जा मिळवल्याचे समोर आले आहे. ही जमीन पुढे अनेक सर्वसामान्यांना विकली गेली, ज्यामुळे एक मोठी फसवणुकीची साखळी निर्माण झाली.

 

7 तत्कालीन ग्रामसेवक, 8 सरपंच दोषी

 

तत्कालीन ग्रामसेवक डी. बी. पाटील, महेंद्र सोनवणे, एन. आर. चंद्रे, (कै.) दिलीप पाटील, राजेंद्र सोनवणे, हरिभाऊ मारवडकर, जगदीश बाविस्कर, तत्कालीन सरपंच राजेंद्र भीमराव पाटील, कैलास राघो पाटील, मीराबाई पाटील, गंभीर नत्थू पाटील, लताबाई पाटील, राजेंद्र भगवान पाटील, विजय भावराव पाटील, गोकूळ विसावे, प्रभारी सरपंच पुष्पा पाटील अशी जमीन लाटणाऱ्यांची नावे आहेत. या सर्वांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दोषी ठरवण्यात आले आहे. आता या सर्वांवर गुन्हे केव्हा दाखल होतात, याकडे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment