मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

लाडक्या बहिणींना खुशखबर ! बँक खात्यावर पैसे जमा; 4500 की 3000 रुपये? लगेच करा चेक !

On: May 14, 2026 7:11 PM
Follow Us:
---Advertisement---

 

लाडक्या बहिणींना खुशखबर ! बँक खात्यावर पैसे जमा; 4500 की 3000 रुपये? लगेच करा चेक !

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

लाभार्थी महिलांना त्यांनी पुन्हा एकदा केवायसी करावी, अशी सूचना करण्यात आली होती. 31 मार्च 2026 पर्यंत केवायसी करावी, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर 30 एप्रिल 2026 पर्यंत केवायसीची मुदत वाढवण्यात आली होती.

 

राज्यातील लाडकी बहीण योजना ही सर्वाधिक चर्चेत असलेली आणि महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिसांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जातो. परंतु फेब्रुवारी महिन्यानंतर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात अजूनही पैसे आले नव्हते. म्हणजेच लाडक्या बहिणींना अजूनही मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नव्हते. म्हणूनच हे पैसे नेमके कधी मिळणार? याची सर्व लाभार्थी महिला वाट पाहात होत्या. आता शेवटी सरकारने हा निर्णय घेऊन टाकला असून महिलांच्या बँक खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली आहे.

 

लाडक्या बहिणींना मिळणार होते 3000 रुपये मे महिना उजडलेला असूनही मार्च आणि एप्रिल अशा दोन महिन्यांचे पैसे खात्यात जमा न झाल्याने लाडक्या बहिणींना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता दोन्ही महिन्यांचे पैसे एकदाच मिळतील असा दावा केला जात होता. म्हणजेच लाडक्या बहिणींना एकदाच थेट 3000 रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे आलेले आहेत. परंतु महिलांना फक्त 1500 रुपयेच मिळाले आहेत. महिलांना 3000 रुपये मिळतील अशी आशा होती. परंतु ही आशा आता अपुरीच राहिली आहे.

महिलांच्या बँक खात्यात किती रुपये आले?

 

आज अनेक महिलांना त्यांच्या बँक खात्यात 1500 रुपये आल्याचा संदेश आला आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी महिलांनी बँक खाते तपासावे असे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे एका प्रकारे लाभार्थी महिलांचाही आकडा कमी झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

लाडक्या बहिणींना खुशखबर ! बँक खात्यावर पैसे जमा; 4500 की 3000 रुपये? लगेच करा चेक !

मोठी बातमी ! नवी मुंबईत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

निधी मंजुरीसाठी लाच प्रकरण : मंत्रालयातील कक्ष अधिकारी ६.३७ लाखांची लाच घेताना एसीबीच्या सापळ्यात अटक

मंत्रालयाच्या बाजूला महाराष्ट्र शासनाच्या जागेवर भारतीय जनता पार्टीला पंधरा हजार चौरस फूट जागा ऑफिस साठी देणारा जीआर रात्री जाहीर करण्यात आलेला आहे, हे

वसई : फेसबुकवर ओळख, भेटायला बोलावून गुंगीकारक पदार्थ दिला; महादेवाचा अवतार असल्याचं सांगून महिलेवर बलात्कार

Leave a Comment