उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा महामोर्चा; हजारोंच्या उपस्थितीत संविधान आणि न्यायासाठी एल्गार
उल्हासनगर
दैनिकशब्दमत न्युज नेटवर्क
उल्हासनगर : अन्याय आणि दडपशाहीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उल्हासनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः मुस्लिम समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती राहिल्याने सामाजिक एकजुटीचे चित्र पाहायला मिळाले.
या महामोर्चाला सुजात दादा आंबेडकर यांची उपस्थिती होती. त्यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेल्या नागरिकांनी शांततेच्या मार्गाने संविधान, न्याय आणि नागरिकांच्या हक्कांसाठी आपली भूमिका मांडली.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते म्हणून सहभागी झालेल्या वक्त्यांनी आपल्या संबोधनातून हा संघर्ष कोणत्याही एका जात किंवा धर्मापुरता मर्यादित नसून संविधान, न्याय आणि नागरिकांच्या अधिकारांसाठीचा लोकशाही संघर्ष असल्याचे स्पष्ट केले.
महामोर्चादरम्यान आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला. “न हिंसा, न अराजकता; केवळ एकजुटीच्या आणि लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे” हा संदेश या मोर्चातून देण्यात आला.
उल्हासनगरमधील या महामोर्चामुळे विविध समाजघटकांनी एकत्र येत आपल्या मागण्यांसाठी लोकशाही पद्धतीने आवाज उठवला. हा केवळ मोर्चा नसून जनतेचा लोकशाही मार्गाने व्यक्त झालेला आवाज असल्याचे आयोजकांनी सांगितले.
संघर्ष संविधानाच्या चौकटीत आणि लोकशाही मार्गाने सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.











