मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

मुख्यमंत्री -मराठा आरक्षण उपसमिती व अन्नत्याग उपोषण कर्ते व समन्वयक यांची संयुक्त बैठक होणार-राजेंद्र दाते पाटील*   शहीद काकासाहेब स्मारक सर्वेक्षण आदेश जारी!

On: October 20, 2026 8:38 AM
Follow Us:
---Advertisement---

*मुख्यमंत्री -मराठा आरक्षण उपसमिती व अन्नत्याग उपोषण कर्ते व समन्वयक यांची संयुक्त बैठक होणार-राजेंद्र दाते पाटील*

 

 

शहीद काकासाहेब स्मारक सर्वेक्षण आदेश जारी!

 

 

 

मुंबई (प्रतिनिधी ): मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत गठीत

करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या महत्त्वपूर्ण बैठक सह्याद्री विश्राम गृह मुंबई येथे १३ऑक्टोबर २०२६ रोजी संपन्न झाली.उच्च न्यायालया तील एस इ बी सी आरक्षणा विरोधातील सुनावणी बाबत अनेक कायदेशीर व घटनात्मक मुद्दे उच्च व सर्वोच्च न्यायालयातील मुख्य हस्तक्षेप याचीकाकर्ता जेष्ठ अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी सविस्तर पणे उपस्थित केल्यामुळे मराठा आरक्षणा मंत्री मंडळ उपसमितीची एस इ बी सी आरक्षणा बाबत ऑक्टोबर शेवटी किंवा नोव्हेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात महत्वाची बैठक हस्तक्षेप याचिका कर्ते व विधिज्ञ यांचे उपस्थितीत राज्य शासन आयोजीत करणार असुन जेष्ठ अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी सविस्तर पणे तयार केलेले पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादरीकरण होणार आहे.

या बैठकीत सविस्तर पणे बोलतांना उच्च व सर्वोच्च न्यायालया तील मुख्य हस्तक्षेप याचीकाकर्ता जेष्ठ अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील म्हणाले की,केजी ते पीजी पर्यंत मराठासमाजाला ओबीसी सारख्या सवलती साठी जी आर मध्ये दुरुस्ती आवश्यक असुन,मराठा समाजाला ओबीसी सारख्या सर्व सवलती के.जी. ते पी.जी. लेव्हल पर्यंत देतांना तांत्रिक,अतांत्रिक, वैद्यकीय शिक्षण,नोकरीतील नियुक्त्या बढती आदी सर्व सवलती लागु करून खाजगी विद्यापीठ, डिम्ड युनिवार्सिटी मध्ये सुद्धा ओ.बी.सी सारख्या सवलती द्याव्यात या मध्ये वयाची अट शिथिलता तर द्यावीच परंतु ओबीसी आणि मराठा समाजातील निर्माण झालेली स्थिती कायम स्वरूपी मिटवण्या साठी “अराजकीय आरक्षण ” हा शब्द आणि वरील प्रमाणे दुरुस्ती करणारा सुधारीत शासनादेश तात्काळ निर्गमित करावे ही सुद्धा अंत्यन्त महत्वाची त्यांची गेली एक दशका पासूनची त्यांची मागणी असुन याच सोबत त्यांनी सारथीला पाच हजार कोटींचा निधी तर स्व. आण्णासाहेब पाटील महामंडळास दहा हजार कोटी निधी,रखडलेल्या नियुक्त्या,आंदोलन काळा तील गुन्हे वापस घेणे आदी मागण्या त्यांनी सविस्तर पणे मांडल्या.त्यानुसार आता एसइबीसी न्यायालयीन प्रकारणासाठी हस्तक्षेप याचिकाकर्ता, विधिज्ञ व अधिकारी यांची बैठक ऑक्टोबर शेवटी किंवा नोव्हेंबर पहिल्याआठवड्यात मुंबईत होणार आहे.

मराठवाड्यातील आरक्षणा बाबत स्वतंत्र बैठकमुंबईत आयोजनाचे नियोजन होऊन इतर मागण्याची पूर्तता करण्यासाठी दर दोन महिन्यात एकदा मुंबईत बैठक घेण्याचे एक मताने ठरले आहे.

 

*शहीद काकासाहेब शिंदे स्मारक जागेचे सर्वेक्षण होणार*

 

महसूलमंत्री बावणकुळे यांचे आदेशा नुसार १० कोटीचे शहीद काकासाहेब शिंदे स्मारक जागेचे सर्वेक्षण होणार असुन मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजी नगरचे ज्येष्ठ अभ्यास डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी ९ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२६ या दरम्यान मराठा समाजाच्या विविध मागण्यां साठी अन्नत्याग उपोषण आंदोलन केले होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचे आदेशा नुसार ५ कोटीचे शहीद काकासाहेब शिंदे स्मारक जागेचे सर्वेक्षण होणार असुन हा अन्नत्याग उपोषण आंदोलन कर्ते डॉ.राजेंद्र दाते पाटील यांचे अन्नत्याग आंदोलना चा परिणाम कृतीत दिसून येत आहे.महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी दूरध्वनी वरून अन्नत्याग उपोषण आंदोलनकर्ते जेष्ठ अभ्यासक डॉ.राजेंद्र दाते पाटील यांच्या शी पत्रकार परिषदेच्या वेळी पत्रकारां च्या समक्ष दूरध्वनी वरून संपर्क साधला आणि आश्वासित केले होते की, या स्मारकासाठी लागणारी जागा ही महसूल विभागाची असल्यामुळे मी ही मागणी मान्य करत आहे असे त्यांनी उपोषण दरम्यान आंदोलना वेळी दस्तूर खुद्द पत्रकारांच्या समक्ष दूरध्वनी वरून आश्वासित केले होते त्या प्रमाणे त्याही मागणीचा पाठ पुरावा करता या मागणीची पूर्तता शासनाच्या वतीने करण्यात आली असून

हुतात्मा स्वर्गीय काकासाहेब शिंदे तसेच आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांच्या स्मरणार्थ कायगाव येथे भव्य असे प्रेरणादायी ” मराठा हुतात्मा स्तंभ स्मारक ” तयार करण्यासाठी पाच एकर जागा आणि पाच कोटीचा निधी देण्याची प्रक्रिया सुरु झाली असुन मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना आदेश देण्याचे मान्य केले आहे.

या बैठकीस मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य मंत्री गिरीश भाऊ महाजन,मंत्री शंभूराजे देसाई,मंत्री आशिष शेलार, मंत्री नरेंद्र पाटील,आ.प्रसाद लाड,सारथीचे व स्व आण्णा साहेब पाटील महामंडळाचे कार्यकारी संचालक तसेच सारथीचे संचालक उमाकांत दांगट आदीनी मार्गदर्शन केले.

या महत्वाच्या बैठकीस मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, सचिव, उपसचिव, आय ए एस दर्जाचे अधिकारी या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

*शहीद काकासाहेब शिंदे स्मारक जागेचे सर्वेक्षण होणार*

 

महसूलमंत्री बावणकुळे यांचे आदेशा नुसार १० कोटीचे शहीद काकासाहेब शिंदे स्मारक जागेचे सर्वेक्षण होणार असुन मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजी नगरचे ज्येष्ठ अभ्यास डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी ९ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२६ या दरम्यान मराठा समाजाच्या विविध मागण्यां साठी अन्नत्याग उपोषण आंदोलन केले होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचे आदेशा नुसार ५ कोटीचे शहीद काकासाहेब शिंदे स्मारक जागेचे सर्वेक्षण होणार असुन हा अन्नत्याग उपोषण आंदोलन कर्ते डॉ.राजेंद्र दाते पाटील यांचे अन्नत्याग आंदोलना चा परिणाम कृतीत दिसून येत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी दूरध्वनी वरून अन्नत्याग उपोषण आंदोलनकर्ते जेष्ठ अभ्यासक डॉ.राजेंद्र दाते पाटील यांच्या शी पत्रकार परिषदेच्या वेळी पत्रकारां च्या समक्ष दूरध्वनी वरून संपर्क साधला आणि आश्वासित केले होते की, या स्मारकासाठी लागणारी जागा ही महसूल विभागाची असल्यामुळे मी ही मागणी मान्य करत आहे असे त्यांनी उपोषण दरम्यान आंदोलना वेळी दस्तूर खुद्द पत्रकारांच्या समक्ष दूरध्वनी वरून आश्वासित केले होते त्या प्रमाणे त्याही मागणीचा पाठ पुरावा करता या मागणीची पूर्तता शासनाच्या वतीने करण्यात आली असून

हुतात्मा स्वर्गीय काकासाहेब शिंदे तसेच आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांच्या स्मरणार्थ कायगाव येथे भव्य असे प्रेरणादायी ” मराठा हुतात्मा स्तंभ स्मारक ” तयार करण्यासाठी पाच एकर जागा आणि पाच कोटीचा निधी देण्याची प्रक्रिया सुरु झाली असुन मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना आदेश देण्याचे मान्य केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणाचे ‘आरे’ कनेक्शन? मुंबई क्राइम ब्रँचकडून कसून तपास!  जंगलात गोळीबाराचा सराव झाल्याचा संशय; कथित प्रशिक्षकाचा शोध सुरू

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचा मोठा खुलासा; कोटा पोलिसांची धडक कारवाई, तीन संशयित ताब्यात!

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहूमध्ये गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई टोळीवर संशय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट

उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा महामोर्चा; हजारोंच्या उपस्थितीत संविधान आणि न्यायासाठी एल्गार 

20 वर्षात 40 बदल्या! मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या लेडी सिंघमने तुकराम मुंढेंचा पण रेकॉर्ड मोडला

लाडक्या बहिणींना खुशखबर ! बँक खात्यावर पैसे जमा; 4500 की 3000 रुपये? लगेच करा चेक !

Leave a Comment