मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहूमध्ये गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई टोळीवर संशय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट

On: October 19, 2026 10:51 AM
Follow Us:
---Advertisement---

 

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहूमध्ये गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई टोळीवर संशय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट

मुंबई (विशेष प्रतिनिधी):‌ दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

मुंबईतील जुहू परिसरात प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना रविवारी संध्याकाळी घडली. या घटनेत टायगर श्रॉफ सुखरूप बचावला असून, त्याच्या गाडीतील दोन जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या वेळी गनपावडरमुळे टायगरच्या हातावर जळल्याच्या खुणा आल्या आहेत, मात्र तो पूर्णपणे सुरक्षित असून त्याला कोणतीही गोळी लागलेली नाही. घटनेची माहिती मिळताच अभिनेत्री दिशा पटानी हिने टायगर श्रॉफच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली.

लॉरेन्स बिश्नोई टोळीचा संशय; एकाला घेतले ताब्यात

पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून ‘लॉरेन्स बिश्नोई टोळी’शी संबंधित एका दाव्याची चाचपणी केली जात आहे. या संदर्भात पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तसेच हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींची पहिली छायाचित्रे समोर आली आहेत.

अंधेरी स्टेशनजवळ दुचाकी जप्त

हल्ल्यानंतर आरोपींनी वापरात आलेली दुचाकी अंधेरी स्टेशनजवळ सोडून पलायन केले. पोलिसांनी ती दुचाकी जप्त केली असून, तपासात ती गाडी मुंबईतच नोंदणीकृत (रजिस्टर्ड) असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस आता गाडीचा चेसिस/इंजिन नंबर आणि नंबर प्लेटच्या मदतीने आरोपींचा माग काढत आहेत. तसेच परिसरातील आणि अंधेरी स्टेशन भागातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली टायगरची भेट

या गोळीबाराच्या घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री टायगर श्रॉफ याच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली आणि घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

मुंबई पोलीस या प्रकरणी पुढील अधिक तपा

स करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणाचे ‘आरे’ कनेक्शन? मुंबई क्राइम ब्रँचकडून कसून तपास!  जंगलात गोळीबाराचा सराव झाल्याचा संशय; कथित प्रशिक्षकाचा शोध सुरू

मुख्यमंत्री -मराठा आरक्षण उपसमिती व अन्नत्याग उपोषण कर्ते व समन्वयक यांची संयुक्त बैठक होणार-राजेंद्र दाते पाटील*   शहीद काकासाहेब स्मारक सर्वेक्षण आदेश जारी!

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचा मोठा खुलासा; कोटा पोलिसांची धडक कारवाई, तीन संशयित ताब्यात!

ग्राहकांना घरपोच गॅस सेवा मिळतेय का? भवानी गॅस एजन्सीविरोधात ग्राहकांच्या तक्रारी; जिल्हाधिकारी कारवाई करणार का?

त्रिमुर्ती चौकात धारदार कोयत्याने वार करणा-र्या आरोपीला जवाहरनगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या…”

उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा महामोर्चा; हजारोंच्या उपस्थितीत संविधान आणि न्यायासाठी एल्गार 

Leave a Comment