मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

जालना लघु पाटबंधारे विभागाच्या सात निविदांमध्ये गैरव्यवहाराचा संशय

On: June 5, 2026 9:30 PM
Follow Us:
---Advertisement---

जालना लघु पाटबंधारे विभागाच्या सात निविदांमध्ये गैरव्यवहाराचा संशय

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

आमदार अंबादास दानवे यांची मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

 

मुंबई, दि. ५ जून : जालना जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागामार्फत पूर संरक्षण भिंतींच्या बांधकामासाठी काढण्यात आलेल्या सात निविदांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत आमदार Ambadas Danve यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

 

दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मार्च २०२६ रोजी घनसावंगी व अंबड तालुक्यातील सात ठिकाणांच्या कामांसाठी सुमारे ८५.५० लाख रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या सर्व निविदांमध्ये केवळ चार कंत्राटदारांनी सहभाग नोंदविला. मात्र तांत्रिक मूल्यमापनादरम्यान दोन कंत्राटदार सातही निविदांमध्ये अपात्र ठरले, तर उर्वरित दोनपैकी एका कंत्राटदाराला सर्व सात कामांचे कंत्राट मिळाल्याचे समोर आले आहे.

 

सातही निविदांमध्ये एकसारखीच परिस्थिती निर्माण झाल्याने निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. तसेच कंत्राटदारांमधील संगनमत, दिखाऊ स्पर्धा आणि निविदा प्रक्रियेत हेतुपुरस्सर हस्तक्षेप झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

 

या प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करून संपूर्ण निविदा प्रक्रिया, तांत्रिक मूल्यमापन, अपात्रतेची कारणे आणि अंतिम कार्यादेश मंजुरीची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

रोपळेकर चौक बॅग स्नेचिंग प्रकरण: जवाहरनगर पोलिसांची धडक कारवाई; आरोपी १२ तासांत गजाआड, ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

Leave a Comment