मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

बचत गट व स्कॉलरशिपचे आमिष; लाखो रुपयांच्या फसवणुकीचा आरोप संघर्ष भालेराव फाउंडेशन ‘युथ आयकॉन संस्थेविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

On: June 19, 2026 9:35 PM
Follow Us:
---Advertisement---

 

 

बचत गट व स्कॉलरशिपचे आमिष; लाखो रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

संघर्ष भालेराव फाउंडेशन

‘युथ आयकॉन

संस्थेविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

 

दैनिक शब्दमत वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, दि. 19 जून :

 

महिलांना बचत गट सुरू करून देणे, व्यवसायासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ‘युथ आयकॉन गायडन्स’ या संस्थेवर करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी संघर्ष भालेराव चॅरिटेबल फाउंडेशन आणि पीडित महिलांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे.

 

तक्रारीनुसार, संस्थेने छत्रपती संभाजीनगर परिसरातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच त्यांच्या मुलांना नोकरी, व्यवसाय आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. या आश्वासनांवर विश्वास ठेवून सुमारे 15 महिला बचत गटांमधील सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

याशिवाय, 50 ते 60 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडूनही आर्थिक रक्कम स्वीकारण्यात आली. मात्र, पैसे स्वीकारल्यानंतर कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे तसेच जमा केलेली रक्कमही परत करण्यात आलेली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

संघर्ष भालेराव चॅरिटेबल फाउंडेशनच्या अध्यक्षा मंगल अशोक सोळसे यांनी परिसरातील महिलांना एकत्रित करून संबंधित संस्थेकडे पैसे जमा केले होते. मात्र, पैसे परत मागितल्यानंतर संस्थेशी संबंधित व्यक्ती आणि एजंटांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. फोनद्वारे मानसिक त्रास देणे, शिवीगाळ करणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

 

या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाने 17 जून 2026 रोजी तक्रार स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी नोंद घेतल्याची माहिती देण्यात आली. तसेच तक्रारीच्या प्रती पोलीस आयुक्त, धर्मादाय आयुक्त, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-2) तसेच सिडको (एन-7) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना सादर करण्यात आल्या आहेत.

 

दरम्यान, कथित आर्थिक फसवणूक प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित महिलांनी केली असून या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.उपशीर्षक :

महिलांकडून व विद्यार्थ्यांकडून रक्कम जमा; सुविधा न मिळाल्याचा आरोप

 

किंवा

 

पीडित महिलांची मुख्यमंत्र्यांकडे धाव; धमक्यांचाही गंभीर आरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment