मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

पहिल्याच पावसात स्मार्ट सिटीच्या कामांची पोलखोल; अर्धवट ड्रेनेज लाईनमुळे नागरिक त्रस्त टाऊन हॉल येथील घटना

On: June 24, 2026 12:26 PM
Follow Us:
---Advertisement---

पहिल्याच पावसात स्मार्ट सिटीच्या कामांची पोलखोल; अर्धवट ड्रेनेज लाईनमुळे नागरिक त्रस्त टाऊन हॉल येथील घटना

 

छत्रपती संभाजीनगर | दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क

 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून शहरात विविध भागांमध्ये ड्रेनेज लाईन व पायाभूत सुविधांची कामे सुरू असताना संबंधित कामांची गुणवत्ता आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी रस्ते उखडले असून, अर्धवट अवस्थेत सोडलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

 

शहरातील काही भागांमध्ये ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले; मात्र काम पूर्ण न करता खड्डे तसेच सोडण्यात आल्याने पावसाचे पाणी साचले आहे. परिणामी वाहनचालकांसह पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. अनेक ठिकाणी चेंबरच्या आजूबाजूचा भाग खचला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

 

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विभागाकडून काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची योग्य दुरुस्ती करण्यात आलेली नाही. पावसामुळे चिखल, पाणी आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढला आहे. काही वाहनचालकांची वाहने खड्ड्यांमध्ये अडकण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

 

नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने या अर्धवट कामांची दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, पाण्याचा निचरा सुरळीत करावा आणि संबंधित ठेकेदारांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

 

पहिल्याच पावसात उघड झालेल्या या स्थितीमुळे महानगरपालिकेच्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

रोपळेकर चौक बॅग स्नेचिंग प्रकरण: जवाहरनगर पोलिसांची धडक कारवाई; आरोपी १२ तासांत गजाआड, ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

Leave a Comment