मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

जालना रोड ते सांगवी बायपास १०० कोटीच्या मध्य भष्टाचार छ संभाजीनगर महानगरपालिका मध्ये झालं घोटाळा प्रभाग क्रमांक ९ मधील १८ कोटींची विकासकामे रखडली; ठेकेदारावर कारवाईची मागणी

On: June 25, 2026 2:39 PM
Follow Us:
---Advertisement---

जालना रोड ते सांगवी बायपास १०० कोटीच्या मध्य भष्टाचार

छ संभाजीनगर महानगरपालिका मध्ये झालं घोटाळा

प्रभाग क्रमांक ९ मधील १८ कोटींची विकासकामे रखडली;ठेकेदारावर कारवाईची मागणी

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

 

राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला विकासकामांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर शहरातील विविध प्रभागांमध्ये विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक ९ मध्ये सुमारे १८ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र संबंधित ठेकेदाराने अनेक कामे अर्धवट अवस्थेत सोडून बिलांची उचल केल्याचा गंभीर आरोप होत असून याबाबत महानगरपालिकेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, विकासकामे अपूर्ण राहिल्यामुळे परिसरातील रस्ते, नाले आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात अर्धवट कामांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.

 

दरम्यान, झोन क्रमांक ६ चे अभियंता चौधरी यांनी संबंधित कामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. योग्य देखरेख व पाठपुरावा न झाल्यामुळे ठेकेदाराने कामे अर्धवट सोडून बिलांची रक्कम उचलल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

या प्रकरणी एमआयएमचे नगरसेवक काकासाहेब काकडे आणि अमजद खान यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी केल्याचे सांगितले. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही रखडलेली कामे पुन्हा सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

स्थानिक नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी अपूर्ण कामांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.

 

 

 

 

 

अर्धवट कामांमुळे नागरिक त्रस्त

 

प्रभाग क्रमांक ९ मध्ये रस्ते, ड्रेनेज आणि इतर विकासकामे अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात चिखल, पाणी साचणे आणि वाहतुकीच्या समस्या वाढल्या असून प्रशासनाने तातडीने लक्ष घा 100 कोटीच्या कामामधूनलण्याची मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment