मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

36 मिमी पावसातच महापालिकेची धावपळ; पूरस्थितीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन !”

On: July 1, 2026 9:00 PM
Follow Us:
---Advertisement---

 

 

“36 मिमी पावसातच महापालिकेची धावपळ; पूरस्थितीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन!”

 

छत्रपती संभाजीनगर | दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क |  दि. १ जुलै

 

छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक भागांत पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि तळघरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नागरिकांना पूर व अतिवृष्टीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

महापालिकेच्या माहितीनुसार, विवेकानंद कॉलेज परिसरात वृक्ष कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. विजय नगर, न्यू हनुमान नगर, उल्कानगरी तसेच सिडको एन-३ परिसरातील तळघर आणि रस्त्यांवर पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त होताच अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरात दिवसभरात 36.08 मिमी पावसाची नोंद झाली.

 

दरम्यान, महापौर समीर राजुरकर आणि आयुक्त अमोल येडगे यांनी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांना सतर्क राहून नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 

महापालिकेने नागरिकांना नदी, नाले, पूल, सखल भाग आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाण्याचा वेग असलेल्या रस्त्यांवर वाहन चालवू नये, विद्युत तारा व खांबांपासून दूर राहावे, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

 

आपत्कालीन मदतीसाठी महानगरपालिका आपत्ती नियंत्रण कक्ष (0240-2617165 / 2617166), अग्निशमन नियंत्रण कक्ष (0240-2334000) तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक 9823270782 वर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका क्रीडा स्पर्धांचे नियोजन

छोटे पंढरपूर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमले; आषाढी एकादशी उत्साहात साजरी

जि.प. प्रशाला सोयगाव येथे गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा

सोयगावच्या पर्यटन विकासाला चालना; रुद्रेश्वर लेणी, वाडी किल्ला, गंगाधार धबधबा व जंजाळा किल्ल्याची पर्यटन विभागाकडून पाहणी

विकसित भारत @2047 च्या दिशेने छत्रपती संभाजीनगरची भक्कम वाटचाल ‘सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट’मुळे शहर विकासाला नवी दिशा; ‘मित्र’ संस्थेसोबत लवकरच सामंजस्य करार

दर्गावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात उलेमा बोर्डाची कारवाई; पोलिसांकडे एफआयआरची मागणी

Leave a Comment