मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

मूल्यवर्धन शिक्षण ही काळाची गरज; फक्त डिग्री नव्हे तर कौशल्यही आवश्यक – तालुका समन्वयक एम. के. नाईक 83 जय कालिंका देवी शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन शिक्षणाचे मार्गदर्शन

On: July 14, 2026 8:34 AM
Follow Us:
---Advertisement---

मूल्यवर्धन शिक्षण ही काळाची गरज; फक्त डिग्री नव्हे तर कौशल्यही आवश्यक – तालुका समन्वयक एम. के. नाईक

….

जय कालिंका देवी शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन शिक्षणाचे मार्गदर्शन

 

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

जय कालिंका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यवर्धन शिक्षण विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सोयगाव तालुका मूल्यवर्धन समन्वयक एम. के. नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवून चालणार नाही, तर व्यावहारिक कौशल्ये, नैतिक मूल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकासही तितकाच महत्त्वाचा आहे,” असे प्रतिपादन केले.

नाईक यांनी विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, सांघिक कार्य, डिजिटल साक्षरता, समस्या सोडवण्याची क्षमता, वेळेचे नियोजन, नेतृत्वगुण, आर्थिक साक्षरता आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या जीवनोपयोगी कौशल्यांचे महत्त्व पटवून दिले. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जीवन कोलते यांनी मूल्यवर्धन शिक्षणाची संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या व सहज भाषेत समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि कौशल्यांचा विकास करून भविष्यात सक्षम नागरिक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाला विकास पाटील, विजयसिंग राजपूत, ज्ञानेश्वर राठोड, पोपटराव सोनवणे, भूषण देसले, अमोल कोलते, मुकुंदा व्यवहारे, भास्कर खमाठ, सुदाम राठोड तसेच शिक्षकेतर कर्मचारी अजबराव चव्हाण, श्याम जाधव, बाबासाहेब कोलते, राहुल बडक, संदीप कोलते आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी जीवन कोलते यांनी तालुका समन्वयक, शिक्षक, पालक आणि उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

रोपळेकर चौक बॅग स्नेचिंग प्रकरण: जवाहरनगर पोलिसांची धडक कारवाई; आरोपी १२ तासांत गजाआड, ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

Leave a Comment