मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

जवाहरनगर पोलिसांची 12 तासांत धडाकेबाज कारवाई; अपहरण व मारहाण प्रकरणातील तिघे जेरबंद

On: July 22, 2026 6:01 PM
Follow Us:
---Advertisement---

जवाहरनगर पोलिसांची 12 तासांत धडाकेबाज कारवाई; अपहरण व मारहाण प्रकरणातील तिघे जेरबंद

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क तयार

जवाहरनगर पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत अपहरण व मारहाण प्रकरणातील तीन आरोपींना अवघ्या 12 तासांत अटक केली. या कारवाईत गुन्ह्यात वापरण्यात आलेली महिंद्रा थार कारही जप्त करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलै 2026 रोजी फकीरचंद उर्फ मनीष शामसिंग महेर (वय 29, मूळ रा. मुळ पेंढापूर, ता. गंगापूर, सध्या अजबनगर, क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर) यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार, रात्री साडेनऊच्या सुमारास सिडको ब्रिजवरून क्रांती चौकाकडे रिक्षाने जात असताना सेव्हन हिल ब्रिजखाली महानगरपालिका बसस्टॉपजवळ दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी रिक्षा अडवून त्यांना खाली उतरविले. त्यानंतर काळ्या रंगाच्या महिंद्रा थारमधून आलेल्या उदय मोतीलाल भरमट उर्फ राजपूत, जावेद अमीन शेख, अनस अय्युब चाऊस व गुह अय्युब शेख यांनी जबरदस्तीने त्यांचे अपहरण करून देवगाव रंगारी येथे नेल्याचा आरोप आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, वाळू वाहतूक व कमिशनच्या पैशाच्या वादातून आरोपींनी त्यांना लाकडी दांड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कपडे फाडून मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करत तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 302/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जवाहरनगर पोलीस व गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने देवगाव रंगारी परिसरात छापा टाकून तीन आरोपींना अवघ्या 12 तासांत अटक करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा थार कार जप्त करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस करीत असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

छोटे पंढरपूर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमले; आषाढी एकादशी उत्साहात साजरी

जि.प. प्रशाला सोयगाव येथे गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा

सोयगावच्या पर्यटन विकासाला चालना; रुद्रेश्वर लेणी, वाडी किल्ला, गंगाधार धबधबा व जंजाळा किल्ल्याची पर्यटन विभागाकडून पाहणी

विकसित भारत @2047 च्या दिशेने छत्रपती संभाजीनगरची भक्कम वाटचाल ‘सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट’मुळे शहर विकासाला नवी दिशा; ‘मित्र’ संस्थेसोबत लवकरच सामंजस्य करार

दर्गावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात उलेमा बोर्डाची कारवाई; पोलिसांकडे एफआयआरची मागणी

अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा इशारा; गुंठेवारी नियमितीकरणासाठी 31 जुलैपर्यंत 90 टक्के सवलत

Leave a Comment