मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

दर्गावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात उलेमा बोर्डाची कारवाई; पोलिसांकडे एफआयआरची मागणी

On: July 24, 2026 12:34 PM
Follow Us:
---Advertisement---

 

दर्ग्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात उलेमा बोर्डाची कारवाई; पोलिसांकडे एफआयआरची मागणी

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

 

शहरातील हजरत शहीद शाद औझ साहिब दर्ग्याबाबत एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय उलेमा बोर्ड (महाराष्ट्र) आणि स्थानिक मुस्लिम समाजाच्या वतीने दर्गा परिसरात धार्मिक विधी पार पाडण्यात आले. यावेळी दर्ग्याला अत्तर व गुलाबपाणी अर्पण करून फुलांची चादर चढविण्यात आली तसेच फातिहा पठण करण्यात आले.

 

या प्रकरणामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्व नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन उलेमा बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. तसेच संबंधित वृत्तवाहिनीचे रिपोर्टर बी. एम. राठोड यांनी दर्ग्याबाबत दिशाभूल करणारी विधाने करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

अखिल भारतीय उलेमा बोर्ड (महाराष्ट्र) चे राज्य सरचिटणीस मोहम्मद शहाबुद्दीन सूद आगर यांनी विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, बेगमपुरा पोलीस ठाणे, महाराष्ट्र वक्फ बोर्ड आणि जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत संबंधितांवर गुन्हा दाखल (एफआयआर) करण्याची मागणी केली आहे.

 

निवेदनात संबंधित दर्गा हा वक्फ बोर्डात नोंदणीकृत असून त्याची नोंद अधिकृत गॅझेट तसेच उमीद पोर्टलवर उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे दर्ग्याबाबत करण्यात आलेले दावे वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचेही बोर्डाने म्हटले आहे.

 

या प्रसंगी सय्यद सादत दर्ग्याचे विश्वस्त, सय्यद मुबीनुद्दीन, इम्तियाज अब्दुल जब्बार, अयुब खान, शेख अजीज, शेख अब्दुल शाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाची व्हिडिओग्राफी करण्यात आली असून आवश्यक पुरावे संबंधित यंत्रणांकडे सादर करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

 

(टीप : वरील वृत्त हे आयोजकांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातील दावे व आरोपांवर आधारित असून संबंधित वृत्तवाहिनी किंवा संबंधित व्यक्तीची भूमिका उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment