गणेश पूजा मंडपात फायरिंग अन् हाणामारी; भाजप महिला आमदार अन् तिच्या पतीवर हल्ला, नेमकं काय घडलं?
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क सीतामढी
MLA Gayatri Devi Husband Attacked: सीतामढी जिल्ह्यात गणपती पूजेदरम्यान हाणामारी व गोळीबाराची घटना. आमदार गायत्री देवी आणि त्यांचे पती रामनरेश यादव थोडक्यात बचावले.
सीतामढी जिल्ह्यात गणपती पूजेदरम्यान हाणामारी व गोळीबाराची घटना.
आमदार गायत्री देवी आणि त्यांचे पती रामनरेश यादव थोडक्यात बचावले.
पूजा समितीचे सचिव प्रीतम कुमार प्यारे गंभीर जखमी झाले.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत तपास सुरू केला आहे.
बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात गणपती पुजेदरम्यान मंडपात भयंकर घडलं. मंडपात जोरदार हाणामारी आणि गोळीबाराचा प्रकार घडला. या घटनेत परिहारच्या आमदार गायत्री देवी आणि त्यांचे पती रामनरेश थोडक्यात बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री बाबा परिहार ठाकूर मंदिर परिसरात गणपती उत्सवानिमित्त पुजेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान, हा भयंकर प्रकार घडला.

यादरम्यान, मंडपात जोरदार हाणामारी झाली. नंतर गोळीबार झाल्याचीही चर्चा आहे. हाणामारीनंतर मंडपात काहीकाळ गोंधळ उडाला होता. मात्र, मंडपात गोळीबार झालं नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. ही भयंकर घटना आमदार गायत्री देवी आणि त्यांचे पती माजी आमदार रामनरेश यादव यांच्या उपस्थितीत घडली आहे. या घटनेत दोघेही थोडक्यात बचावले आहेत.