पोलिस हवालदार लाच घेताना रंगेहात; लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना युनिटने आज (दि. 31 ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगर शहरातील MIDC सिडको पोलीस ठाण्यात सापळा रचून पोलिस हवालदारास लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. हैदर अब्दुल खलील शेख (वय 54, पो. हवालदार, बक्कल क्र. 1094) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलि नाव आहे.
Join WhatsApp
9423056374
तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्हा बी फायनल करण्यासाठी PSI मुंढे यांच्या सांगण्यावरून हवालदार हैदर शेख यांनी एकूण 20 हजार रुपयांची लाच मागणी केली होती. यापैकी 10 हजार रुपये पूर्वीच स्वीकारण्यात आले होते. आज उर्वरित 5 हजार रुपये घेण्यासाठी हैदर शेख यांना तक्रारदारास बोलावण्यात आले. त्यावेळी जालना युनिटच्या पथकाने सापळा रचून पंचासमक्ष हैदर शेख यांना लाच स्वीकारताना अटक केली.
MIDC सिडको पोलीस ठाण्यात सापळा रचून पोलिस हवालदारास लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. हैदर अब्दुल खलील शेख (वय 54, पो. हवालदार, बक्कल क्र. 1094) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.
तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्हा बी फायनल करण्यासाठी PSI मुंढे यांच्या सांगण्यावरून हवालदार हैदर शेख यांनी एकूण 20 हजार रुपयांची लाच मागणी केली होती. यापैकी 10 हजार रुपये पूर्वीच स्वीकारण्यात आले होते. आज उर्वरित 5 हजार रुपये घेण्यासाठी हैदर शेख यांना तक्रारदारास बोलावण्यात आले. त्यावेळी जालना युनिटच्या पथकाने सापळा रचून पंचासमक्ष हैदर शेख यांना लाच स्वीकारताना अटक केली.
या कारवाईत आरोपीकडून 5 हजार रुपयांची लाच रक्कम, 3 हजार 350 रुपये रोख तसेच vivo कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू असून MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
ही कारवाई उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक घायवट, गजेंद्र भुतेकर, मनोहर भुतेकर, गजानन काबळ व अशोक राऊत यांचा समावेश होता.
शशिकांत सिंगारे यांनी कारवाईला दिशा रिJoin WhatsApp
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी जर कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ तक्रार करावी.
टोल फ्री क्रमांक : 1064 / 9764021064