छत्रपती संभाजीनगर सिडको एन ४ भागात राहणाऱ्या ५४ वर्षीय पत्रकार महिलेला नग्न करून मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोघांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिसांनी बुधवारी (३ सप्टेंबर) गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती संभाजीनगर दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
सिडको एन ४ भागात राहणाऱ्या ५४ वर्षीय पत्रकार महिलेला नग्न करून मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोघांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिसांनी बुधवारी (३ सप्टेंबर) गुन्हा दाखल केला आहे.
एका ४२ वर्षीय ब्रोकरचा आणि महिलेकडे भाड्याने राहणाऱ्या ३६ वर्षीय व्यक्तीचा संशयितांत समावेश आहे. महिलेने तक्रारीत म्हटले, की त्या २५ वर्षांपासून पत्रकार असून, त्यांचा माय वर्ल्ड, चिकलठाणा येथे फोर बीएचके फ्लॅट आहे. एप्रिल २०२५ मध्ये त्या कामानिमित्त ठाणे (मुंबई) येथे गेल्या असता ब्रोकरने कॉल करून त्याच्या नातेवाइकासाठी फ्लॅट भाड्याने देण्याबद्दल विचारणा केली.

फ्लॅटचे भाडे ४२ हजार महिना व १ लाख रुपये डिपॉजिट असे ठरवले. ३० एप्रिल २०२५ रोजी ब्रोकरचा नातेवाइक सपत्नीक राहायला आला. मात्र याने अलीकडच्या काळात भाडेच दिले नाही. महिलेने वारंवार कॉल व व्हॉट्स अॅप मेसेजेस करून भाडे मागितले. मात्र त्यांनी दिले नाही. ८ मे रोजी ब्रोकर महिलेकडे आला. घर शिफ्टींगसाठी, घराच्या क्लिनिंग व ट्रॉली मेंटेनन्ससाठी पैसे लावले. ते पैसे आधी परत करण्यास त्याने सांगितले. मेसेज करून तू मूर्ख बाई आहेस, असे म्हणून शिवीगाळ केली.

१७ ऑगस्टला महिलेने पुन्हा भाडेकरूला कॉल करून घर खाली करायची विनंती केली असता त्याने फोनवर तू या फ्लॅटवर येऊन तर बघ तुला भोंगळ करून मारेल, असे बोलून अश्लील शिवीगाळ करून ब्रोकरला पाठवून तुला जीवे मारीन, अशी धमकी दिली. घराचे भाडे देत नसल्यामुळे व घरही खाली करत नसल्यामुळे मला मानसिक त्रास होत असल्यामुळे पोलिसांत तक्रार करत असल्याने महिलेने म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार केशव कासारे करत आहेत.