Sunday, October 5, 2025
Homeमराठवाडाछत्रपती संभाजीनगरभाकरवाड़ी रस्ता करताना ठेकेदाराची मनमानी!; मुरुमऐवजी मातीचा भराव, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!!

भाकरवाड़ी रस्ता करताना ठेकेदाराची मनमानी!; मुरुमऐवजी मातीचा भराव, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!!

 

लाडसावंगी ते चौका अन् लाडसावंगी ते भाकरवाडी रस्ता करताना ठेकेदाराची मनमानी!; मुरूमऐवजी मातीचा भराव, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष !

 

लाडसावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर (राजू जैवळ : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लाडसावंगी ते चौका आणि लाडसावंगी ते भाकरवाडी रस्त्यावर मुरुमऐवजी माती टाकून रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता किती दिवस टिकेल, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ठेकेदार कंपनीच्या या मनमानीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचाही अर्थपूर्ण पाठिंबा असल्याची चर्चा आहे.

लाडसावंगी ते चौका अन् लाडसावंगी ते भाकरवाडी रस्ता करताना ठेकेदाराची मनमानी!; मुरूमऐवजी मातीचा भराव, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष !!

भाकरवाडी रस्ता करताना ठेकेदाराची मनमानी!; मुरूमऐवजी मातीचा भराव, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!!

 

रस्त्यासाठी खोदकाम केल्यानंतर मुरूम टाकून दबाई करणे आवश्यक आहे. मात्र मुरमा ऐवजी काळी माती वापरली जात असल्याने रस्ता लवकरच उखडला जाईल, असे चित्र आहे. शेंद्रा एमआयडीसीला जोडण्यासाठी चौका ते लाडसावंगी व करमाड ते लाडसावंगी व भाकरवाडी या रस्त्याचे रूंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी जवळपास दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात चौका ते लाडसावंगी व लाडसावंगी ते भाकरवाडी या रस्त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे तर करमाड ते लाडसावंगी या रस्त्याचे अद्याप काम सुरू झाले नाही. शिवाय लाडसावंगी व भाकरवाडी रस्त्यावर मुरूमऐवजी काळी माती वापरली जात आहे. यात या रस्त्याच्या कामाची देखभालही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र या कामावर संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने दोनशे कोटी रुपयांचा निधी वाया जाणार तर नाही ना, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या विषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हरिसिंग ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments