वेळेत पोलिसांची गाडी आल्याने कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांची लूट टळली!; तिघांना अटक,
: पाहून धाव घेतली. पोलिसांना पाहून लुटारू पळू लागले. पण पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. तिघांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (७ सप्टेंबर) दुपारी चारला जालना मार्गावरील धूत हॉस्पिटलसमोर घडली.
रिक्षाचालक विनीत रमेश घोडके (वय २९,), सौरभ दिलीप घोडके (वय २४, दोघे रा. बीएसएनएल टेलिफोन ऑफिस समोर छावणी), प्रदीप साहेबराव साळवे (वय ३९, रा. भीमनगर भावसिंगपुरा, श्रावस्ती बौद्ध विहाराजवळ) अशी लुटारूंची नावे आहेत. अभिजीत सुभाष हिवराळे (वय ३२, रा. श्रीपाद कॉलनी जटवाडा रोड हसूल) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते कॅनरा बँकेच्या सेव्हन हिल शाखेत अधिकारी आहेत. रविवारी त्यांची लाईफ इन्शुरन्स विभागाची एमआयडीसी सिडको हद्दीतील आय ऑन सेंटर येथे लेखी परीक्षा होती. त्यांचे वडील सुभाष हिवराळे यांनी त्यांना दुपारी दीडला मोटारसायकलीने परीक्षा केंद्रावर आणून सोडले.
पेपर दुपारी साडेतीनला संपल्यानंतर एका मोटारसायकलस्वाराकडून लिफ्ट घेऊन अभिजित हे धूत हॉस्पिटलसमोर आले. तिथे धूत हॉस्पिटलच्या गेटसमोर थांबून ते त्यांच्या मोबाईलवरून चित्रपट बघायला जाण्यासाठी तिकीट बुक होते. अचानक चारच्या सुमारास मागून सडपातळ मुलगा आला. तो म्हणाला, की तू काय व्हिडिओ काढतो… मला तुझा मोबाईल दे… अभिजित यांनी नकार देत माझे वडील पीएसआय आहेत. मी तुला मोबाईल देणार नाही, असे म्हटले. त्यावर तिथे आणखी दोन मुले आली. आम्हाला मोबाईल पाहिजे, मोबाईल दे, असे म्हणून त्यांनी झटापट सुरू केली.
मोबाईल देत नसल्याने त्यांनी अभिजित यांना मारहाण सुरू केली. त्याचवेळी तिथून पोलिसांची गाडी जात असताना थांबली. त्यांनी अभिजित यांची सुटका केली. त्यादरम्यान तिघांपैकी एक जण मोबाईल हिसकावून पळाला. त्याला पोलिसांनी पकडले. त्या तिघांना व अभिजित यांना पोलिसांनी गाडीत बसवून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तिघा लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक विष्णू मुंढे करत आहेत.