मोठी बातमी : हर्सल जेलमध्ये ५ कैद्यांचा राडा!; तुरुंगाधिकाऱ्यांना मारहाण, इतके आक्रमक झाले की कर्मचाऱ्यांनाही ऐकत नव्हते…, नक्की काय अन् कशामुळे घडलं जाणून घ्या…
छत्रपती संभाजीनगर दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
- हर्सल मध्यवर्ती कारागृहात रविवारी (७ सप्टेंबर) दुपारी दीडला ५ बंदिवानांनी मोठा राडा केला. एका बंद्याकडे संशयास्पद वस्तू आढळली. त्याबद्दल तुरुंगाधिकारी आणि त्यांचे सहकारी चौकशी करत असताना अचानक पाचही बंदी आक्रमक झाले आणि त्यांनी हल्ला चढवला. तुरुंगाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली आहे. धोक्याची शिटी वाजवण्यात आल्याने जेलमधील सर्व कर्मचारी-अधिकारी बॅरेक २ कडे धावले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
तुरुंग अधिकारी योगेश शिंदे यांनी हसूल पोलिसांना या घटनेबाबत कळवले. हर्मूल मध्यवर्ती कारागृहात बंदी रितेश उर्फ विक्की भगवान पुसे, पवन ईश्वरलाल जैस्वाल, विनोद सुभाष शिंदे, ओम दादाराव म्हस्के, आनंद सुरेश लोखंडे यांना जुने सर्कल-१६ विभागातील वेगवेगळ्या बॅरेकमध्ये ठेवले होते. रविवारी दुपारी दीडला तुरुंगाधिकारी पाहणी करत असताना बॅरेक क्र. २ मध्ये हे सर्व बंदी बसलेले आढळले.
त्यांच्या हालचाली संशयास्पद भासल्या. त्यामुळे तुरुंगाधिकारी शिंदे आणि सहकारी कर्मचाऱ्यांनी बॅरेकमध्ये जाऊन त्यांची झडती घेतली. तेव्हा बंदी रितेश पुसे याच्याकडे लाईट फिटींगकरिता वापरण्यात येणाऱ्या क्लीपचा धारदार पत्र्याचा तुकडा आढळला. तुरंगाधिकाऱ्यांनी त्याच्याकडे या तुकड्याबाबत विचारपूस केली. तेव्हा पाचही बंदी वाद घालू लागले. पैकी पवन जैस्वाल, विनोद शिंदे, आनंद लोखंडे हे तीन बंदी हे वेगवेगळ्या बॅरेकमध्ये बंदिस्त असताना देखील विनापरवाना त्यांचे बॅरेक सोडून बॅरेक क्र. २ मध्ये बसलेले आढळले.
जैस्वाल, विनोद शिंदे, आनंद लोखंडे हे तीन बंदी हे वेगवेगळ्या बॅरेकमध्ये बंदिस्त असताना देखील विनापरवाना त्यांचे बॅरेक सोडून बॅरेक क्र. २ मध्ये बसलेले आढळले.
अचानक आक्रमक झाले…
तुरुंगाधिकारी चौकशी करत असतानाच अचानकच बंदी रितेश पुसे याने हल्ला चढला. तुरुंगाधिकाऱ्यांची कॉलर ओढून अंगावर धावून आला. इतर चारही बंद्यांनी कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येत शिवीगाळ केली. पाचही बंदी आरडाओरड करत होते. कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनी धोक्याची शिट्टी वाजवून इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाचारण केले. त्यानंतर पाचही बंदी अत्यंत आक्रमक होऊन तुरुंगाधिकारी शिंदे यांना मारहाण करू लागले. त्यामुळे सहकारी कर्मचाऱ्यांनी बंद्यांना आटोक्यात आणण्यासाठी सौम्यबळाचा वापर केला व परीस्थिती नियंत्रणात आणली. थोड्याच वेळात इतर सर्कलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हर्मूल पोलिसांनी पाचही कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन सदाफुले करत आहेत.