जितेंद्र खापरे, नागपूर : राज्यातील गरीब, गरजूंना आणि श्रमिक वर्गासाठी कमी दरात पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणारी शिवभोजन योजना सध्या थकबाकीमुळे गंभीर संकटात सापडली आहे. नागपूर शहर व ग्रामीण भागातील केंद्रचालकांनी सात महिन्यांपासून थकीत असलेले बिल मिळावे, यासाठी सोमवारी संविधान चौकात धरणे आंदोलन केले.
[ गरिबांच्या भुकेचा ‘आधार’ संकटात, शिवभोजन योजनेची आर्थिक कोंडी; केंद्र चालक उतरले रस्त्यावर
Shivbhojan Thali :
राज्यातील गरीब आणि गरजू
लोकांसाठी सुरू करण्यात आलेली शिवभोजन योजना थकबाकीमुळे अडचणीत आली आहे. नागपूरमधील केंद्र चालकांनी थकीत बिल मिळावे म्हणून संविधान चौकात धरणे आंदोलन केले. मागील सात महिन्यांपासून बिल न मिळाल्याने केंद्रचालक आर्थिक संकटात सापडले असून, योजनेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
राज्य शासनाच्या १ जानेवारी २०२० च्या निर्णयानुसार सुरू झालेल्या या योजनेला गरीब कुटुंबांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नागपूर शहरात तब्बल १६४, तर ग्रामीण भागात ४६ केंद्रे कार्यरत असून राज्यभर जवळपास १९ हजार केंद्रांमधून दररोज हजारो लोकांना स्वस्तात भोजन मिळते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून केंद्र चालकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
केंद्रचालकांचे म्हणणे आहे
आघाडी सरकारच्या काळात बिल वेळेवर मंजूर होत असे. मात्र, महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर थकबाकी रोखून ठेवली गेली असून त्यामागे जाणीवपूर्वक डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या वार्षिक फक्त २७० कोटी रुपयांचा खर्च असणाऱ्या या योजनेसाठी सरकारने यंदा केवळ ७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे शासनाची भूमिका नकारात्मक असल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.