बुद्धलेणी परिसरात ब्लास्टिंग; चौघांवर गुन्हा, एकाला अटक
ग्राम महसूल अधिकाऱ्यांची फिर्याद; एफआयआरमध्ये ‘लोकमत’च्या बातमीचा संदर्भ
दैनिक शब्दमत इम्पॅक्ट
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक बुद्ध
लेणी परिसरात ब्लास्टिंग केल्याच्या धक्कादायक प्रकारात अखेर स्फोट घडवणाऱ्या ४ जमीनधारकांवर बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बेगमपुरा पोलिसांनी एकाला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली.
जीवनलाल कुंदनलाल डोंगरे, पृथ्वीराज कुंदनलाल डोंगरे, प्रेमराज कुंदनलाल डोंगरे व हंसराज कुंदनलाल डोंगरे (सर्व रा. तारकस गल्ली, बेगमपुरा), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील प्रेमराजला अटक केल्याचे निरीक्षक जगताप यांनी सांगितले. महसूलच्या वतीने तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी दगडू जरारे (५४) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली. बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग केल्याने या ऐतिहासिक लेणीला धोका निर्माण होत असल्याने इतिहासप्रेमींनी संताप
एकास अटक, बाकी पसार
आरोपीपैकी प्रेमराज डोंगरेला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अन्य आरोपी पसार झाले आहेत.
व्यक्त केला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने २७ जून रोजी ‘बुद्ध लेणीला हादरे, अवैध ब्लास्टिंग रोखणार कोण?’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. ‘shabdmat’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची खंडपीठाने स्वतः जनहित याचिका दाखल करून घेतली. जिल्हा प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी केली. जरारे यांनी तक्रारीत नमूद माहितीनुसार, ‘shabdmat’च्या वृत्तानंतर त्यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करण्याचा आदेश दिला. पाहणीत आरोपींच्या सर्व्हे क्रमांक २३४ मधील जमिनीवर कणखर दगड फोडल्याचे दिसून आले. परिसरात दगडाचे बारीक तुकडेदेखील होते. डोंगरे कुटुंबाला याबाबत विचारणा केल्यावर त्यांच्याकडे स्फोटासाठी कुठलीही परवानगी नसल्याचे समोर आले.
बुद्ध लेणीला हादरे; अवैध ब्लास्टिंग रोखणार कोण?
२७ जून
२८ जून
बुद्ध लेणीला ब्लास्टिंगचा धोका; खंडपीठाने स्वतःहून घेतली दखल
बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग; गुन्हा दाखल
२ जुलै
२३४
प्रशासनाने जमिनीविषयी माहिती मिळवली
चारही आरोपींनी जमीन सपाटीकरणाची परवानगी मिळाल्याचे सांगितले. सदर पडीत जमीन चौघांच्या सामाईक क्षेत्रातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महसूल विभागाने सदर घटनेचा पंचनामा केला. मंडळ अधिकारी कल्याण वानखरे यांच्या आदेशावरून जरारे यांनी फिर्याद दाखल केली.
Chhatrapati Sambhajinagar Main
Page No. 4 Jul 04, 2025
Powered by: erelego.com
ठपका काय ?
आरोपींवर बारीपदार्थ
अधिनियम १९०८ अंतर्गत ३ (अ), बीएनएस १२५ व २८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील शाळा, नागरिकांच्या मालमत्तांना हानी पोहोचवून जीवितास थोका निर्माण होईल, असे बेकायदेशीर व हलगर्जीपणाचे कृत्य केल्याचा ठपका आहे. एफआयआर दाखल करताना तक्रारीत ‘. shabdmat ‘च्या बातमीचा संदर्भ देण्यात आला.