Sunday, October 5, 2025
Homeमराठवाडाछत्रपती संभाजीनगरसिल्लोडमध्ये दुय्यम निबंधकांच्या नावे ५८ हजारांची लाच घेताना प्रॉपर्टी एजंट ताब्यात

सिल्लोडमध्ये दुय्यम निबंधकांच्या नावे ५८ हजारांची लाच घेताना प्रॉपर्टी एजंट ताब्यात

 

सिल्लोडमध्ये दुय्यम निबंधकांच्या नावे ५८ हजारांची लाच घेताना प्रॉपर्टी एजंट ताब्यात

  • दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सिल्लोड : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात प्लॉटची नोंदणी

 

करून देण्यासाठी प्लॉटधारकाकडे शासकीय चलानाच्या दहा हजारांसह ‘साहेबां’च्या नावे ७० हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली. यातील ५८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रॉपर्टी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मार्केट यार्ड येथे सापळा रचून पकडले. सांडू नारायण शेलार (वय ४६, रा. समतानगर, सिल्लोड) असे आरोपीचे नाव आहे.

 

लाच मागितली होती. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार केली होती. याची शासकीय पंचासमोर पडताळणी केली असता आरोपीने ६८ हजार स्वीकारण्याचे कबूल केले. त्यात १० हजार चालान व ५८ हजार लाच घेणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शुक्रवारी सिल्लोड येथील मार्केट यार्ड इमारती येथे एसीबीने सापळला रचला असता एजंट शेलार याला ५८ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. एसीबी पथकाने त्याच्या ताब्यातून लाचेच्या ५८ हजारांसह एक मोबाइल जप्त केला. ही कारवाई एसीबीचे निरीक्षक केशव दिंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिस हवालदार अशोक नागरगोजे, अंमलदार विलास चव्हाण व सी. एन. बागुल यांच्या पथकाने केली. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात आरोपी शेलारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दुय्यम निबंधकाची चौकशी होणार का? प्रॉपर्टी एजंटने

 

शासकीय चालानसह दुय्यम निबंधकाच्या नावे ७० हजारांची लाच मागितल्याचे एसीबीच्या कारवाईत निष्पन्न झाले. याप्रकरणी प्रॉपर्टी एजंट शेलारला अटकही करण्यात आली. परंतु, ज्या अधिकाऱ्यांच्या नावे त्याने लाच मागितली, त्यांची चौकशी केली जाणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

 

२ लाख ३७ हजार प्रमाणपत्र घेऊ शकतो. त्यापैकी पाच हजार लोकांना जातपडताळणी करता आली. अशी काही अडचण होऊ नये म्हणून मराठा शब्दाचा समावेश करण्यात आला, तर कोणतीही भानगड करायची गरज पडणार नाही. त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येईल. तोच मराठा आरक्षणासाठी पात्र ठरेल. तीच मागणी सर्वोत्तम मागणी आहे, असे वकील केदार म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments