खुलताबाद तालुक्यात पोलिसांची संख्या कमी असल्याने अवैध धंदे; चोरी, लुटमार वाढली
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर
खुलताबाद : तालुक्यात दिवसांदिवस भुरट्या चोरट्यांची
हिम्मत वाढली असून ठिकठिकाणी चोरी, लुटमार व अवैध धंदे वाढल्याचे चित्र असून पोलिस संख्या कमी असल्याने चोरट्यांना व अवैध धंदेवाल्यांना धाक ना भिती नसल्याचे सद्या चित्र पहावयास मिळत आहे.
खुलताबाद पोलिस ठाण्या अंतर्गत बाजार सावंगी सुलतानपूर खुलताबाद वेरुळ पोलिस बीट असुण बाजार सावंगी येथे दुरक्षेत्र पोलिस चौकी कार्यरत आहे. त्यात खुलताबाद भद्रा मारुती, वेरुळ बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर व जगप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ लेण्या, तर महेशमाळ सतत भाविक भक्त पर्यटक शासकीय अधिकारी यांची वर्दळ असते. यात वेळोवेळी पोलिस बंदोबस्त मदत व इतर शासकीय व सर्व सामान्य कार्य पोलिस बळ करत असतात. त्यामुळे पोलिस बळ नागण्य ठरतं. अशात तालुक्यात ठिकठिकाणी काहीना काही बंदोबस्त सुरुच असतो यामुळे पोलिस संख्या तोकडी ठरते. यामुळे तालुक्यात सद्या ठिकठिकाणी भुरट्या चोरट्यांकडून चोऱ्या होत आहे. गल्ले बोरगाव येथे दिवसा ढवळ्या अंशी हजार रोख रक्कम
बँकेतून पळवली, वेरुळ येथे विहिरी वरून सोलर दोन प्लेट २० हजाराची चोरून नेली, वेरुळ येथून पर्यटकाची वस्तू पळवली तालुक्यात एक ना अनेक प्रकार चोऱ्यांच्या घडत आहे. पोलिसांकडून रात्रीचे गस्त बंद आहे.
तालुक्यात ठिकठिकाणी अवैध धंदे गौण खनिज वाळु व्यवसाय, अवैध दारु विक्री, रात्रीला उशीरा पर्यंत हाँटेलस उघडी व अवैध दारु विक्री, रात्री अप रात्री दिवसा वृक्ष तोड व वाहतूक सर्रास दिवसाढवळ्या अवैध धंदे सुरू आहे. बीट मधे नियुक्त पोलिस कर्मचारी दिसून येत नाही. चौकशी केली तर तपासणी वर गेले आहे असे उत्तर मिळते. नियुक्त पोलिस कर्मचारी आप आपल्या हिशोबाने कार्य करण आहे. त्यात तपास व कारवाई कुठे दिसून येत नाही. तर तालुक्यात आत्महत्या व आकास्मीक मृत्यू चा बोलबाला आहे. त्याचा तपास कधि लागला नाही व प्रसिध्दीत दिसून आला नाही. याकडे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पोलिस उप विभागीय अधिकारी यांनी विशेष लक्ष घालण्याची व पोलीस कर्मचारी वाढवून कार्य करण्याची गरज निर्माण झाली