अनैतिक संबंधाच्या संशयावरून २७ वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला, नारेगावातील खळबळजनक घटना
अनैतिक संबंधाच्या संशयावरून २७ वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला, नारेगावातील खळबळजनक घटना
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर
अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून २७ वर्षीय विवाहित तरुणीवर ३ महिला आणि १ पुरुषाने मिळून चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही घटना नारेगावच्या अजिज कॉलनीत सोमवारी (८ सप्टेंबरला) दुपारी दीडच्या सुमारास घडली.
तरुणीने तक्रार दिली, की ती पतीसोबत राहते. सोमवारी दुपारी दीडला ती एकटी घरी असताना तीन अनोळखी महिला आणि आमेर नावाचा युवक तिच्या घरी आले. त्यातील एक महिला म्हणाली, की तुझे माझ्या बहिणीच्या पतीसोबत अनैतिक संबंध आहेत. जर तू असे काही केलंस तर तुला जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर सर्वांनी शिवीगाळ करून तरुणीला हाताचापटाने मारहाण करायला सुरुवात केली. आमेर याने बेल्टमधून चाकू काढून तरुणीच्या उजव्या पायाच्या मांडीवर मारून जखमी केले. सर्व जण मारहाण करून निघन गेले.
अजिज कॉलनीत सोमवारी (८ सप्टेंबरला) दुपारी दीडच्या सुमारास घडली.
तरुणीने तक्रार दिली, की ती पतीसोबत राहते. सोमवारी दुपारी दीडला ती एकटी घरी असताना तीन अनोळखी महिला आणि आमेर नावाचा युवक तिच्या घरी आले.
त्यातील एक महिला म्हणाली, की तुझे माझ्या बहिणीच्या पतीसोबत अनैतिक संबंध आहेत. जर तू असे काही केलंस तर तुला जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर सर्वांनी शिवीगाळ करून तरुणीला हाताचापटाने मारहाण करायला सुरुवात केली. आमेर याने बेल्टमधून चाकू काढून तरुणीच्या उजव्या पायाच्या मांडीवर मारून जखमी केले. सर्व जण मारहाण करून निघून गेले.
त्यानंतर तिचा पती घरी आला. त्याने तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास पोलीस अंमलदार राजू कोतवाल करत आहेत.
