80:20 निर्णयाविरोधात छत्रपती संभाजीनगर येथील उपोषणकर्त्यांच्या उपस्थितीत नांदेड येथे तीव्र निदर्शने..
छत्रपती संभाजीनगर
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
बीड दि १०/९/२५ वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई यांनी परिचारिका भरती प्रक्रियेत ऐंशी टक्के महिला व वीस टक्के पुरुष नुकतीच अशी अधिसूचना काढण्यात आली, यावर राज्य भरातील नर्सिंग विद्यार्थी व युवकांमध्ये तिव्र नाराजी आहे, याबाबत अधिक माहिती अशी की,
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रमुख राज्यभर विविध महाविद्यालय व रुग्णालय आहेत त्यामध्ये परिचारिका पदवी महाविद्यालय व त्याला जोडून रुग्णालय आहेत, या सर्व रुग्णालयात परिचारिकांची मोठी गरज भासत असते याच्या संबंधित भरती प्रक्रिया राज्य सरकार मार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातर्फे राबविण्यात येत असते, यासंदर्भात काही दिवसांपूर्वी संबंधित विभागाने परिपञक काढून अचानक ऐंशी टक्के महिला परिचारिका व वीस टक्के पुरुष परिचारिक असा अन्यायकारक निर्णय घेतला अशी तिव्र भावना नर्सिंग महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थी व शिक्षन पुर्ण झालेल्या युवकांनी मांडत मेळावा आयोजित केला या माध्यमातून आपल्या तिव्र भावना शासनदरबारी मांडण्यासाठी सर्वाच पक्षाचे लोकप्रतिनिधी यांना निवेदन देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला, याचाच भाग म्हणून आज शहरातील सर्वच विधानसभा व विधान परिषद शहरातील मंत्री महोदय यांना निवेदन देऊन हा प्रश्न किमान विधानसभा पटलावर मांडावा अशी विनंती करण्यात आली तरीही आतापर्यंत एकाही विधिमंडळ सदस्याने हा मुद्दा मांडलेला नसल्यामुळे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे…
दि.५/८/२५ रोजी मंत्रालयावर समितीच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल आंदोलन केले होता त्याची दखल घेऊन प्रशासनाने दि. ६/८/२५ रोजी वैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमार यांच्यासोबत बैठक लावण्यात आली होती, त्या बैठकीत समितीतर्फे विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तर न मिळाल्यामुळे व रद्दबाबत ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे ती बैठक असमाधानकारक झाली असे आमचे मत आहे..
त्याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनानिवेदन देण्यात आले होत…
यावर काही निर्णय न झाल्यास सर्व विद्यार्थ्यांतर्फे राज्यभर आणखी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता…
या जनआंदोलनाचाच पुढचा भाग म्हणून दि. १८/८/२५ रोजीपासून छ. संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे तब्बल (११) अकरा दिवस बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते या उपोषणादरम्यान संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस हे संभाजीनगर दौऱ्यावर असताना त्यांची शिष्टमंडळाला विमानतळावर भेट घडवून आणण्यात आली होती, त्यात मुख्यमंत्री म्हणाले होते की ८०:२० बद्दल मला माहिती आहे मी यावर तातडीने करतो, तातडीने करतो असे आश्र्वासन दिले होते त्यामुळे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते…
या जनआंदोलनाचा पुढचा भाग म्हणून उपोषणकर्ते सचिन खंदारे, दुर्गादास शिंदे, शंकर नाईकनवरे, अनंत सानप यांच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय मेल नर्सेस बचाव समितीच्या राज्य कमिटीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे, त्याची सुरुवात आपल्या शहरात आज १०/९/२५ रोजी निदर्शने करून करत आहोत….
या समितीच्या लढ्याला नर्सिंग मुली व सद्य स्थितीत शासनदरबारी काम करत असलेल्या फिमेल (महिला) नर्सेस यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे….
मुख्यमंत्र्यांनी तातडीने करतो हा दिलेला शब्द पाळावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात छ. संभाजीनगरला जमा होईल असा इशारा समितीतर्फे राज्य समन्वयक सम्यक जमधडे, डेव्हिड लोखंडे, सतीश सर्वगौडे, अनिल जायभाय यांनी केले आहे…
आजच्या आंदोलनामध्ये सथानिक नर्सिंग विद्यार्थिनींनी चांगल्या संख्येनं सहभाग नोंदवला यामध्ये सुचिता सोनाळे, रिना तुरे, साक्षी शेळके, स्वाती पाटील, भक्ती ताटे, प्रतीक्षा चंदेल, प्रज्ञा निवडांगे, उमेश मुळे, हसन शेख, योगेश नागपुरे, सूर्या कांबळे, ऋषिकेश रुद्रा, धनंजय फुले, निवृत्ती वडजे, सतीश पांचट, नितीन शेळके, सचिन सरोदे, सदानंद मोठे यांनी परिश्रम घेतले..