Sunday, October 5, 2025
Homeमराठवाडाछत्रपती संभाजीनगरशिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी आ. विलास भुमरे!, रमेश पवार यांना का हटवले...

शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी आ. विलास भुमरे!, रमेश पवार यांना का हटवले होते

 

शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी आ. विलास भुमरे!, रमेश पवार यांना का हटवले होते

 

छत्रपती संभाजीनगर दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क  जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाने तयारी सुरू केली आहे. यासाठी आमदार विलास भुमरे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना सिल्लोड, सोयगाव, पैठण आणि फुलंब्री या मतदारसंघांसाठी जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यात आले आहे.

 

आता विलास भुमरे यांना जिल्हाप्रमुख करण्यात आले आहे. शिंदे गटात सध्या तीन जिल्हाप्रमुख झाले असून, यात शहरातील तिन्ही मतदारसंघांची जबाबदारी सध्या राजेंद्र जंजाळ यांच्याकडे तर गंगापूर, वैजापूर, कन्नड मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख म्हणून सध्या भरत राजपूत आहेत. आ. भुमरे यांच्याकडे जिल्हाप्रमुख झालेल्या मतदारसंघात जिल्हा परिषदेचे २२ गट, तर ४४ पंचायत समितीचे गट आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका महायुतीत लढण्याचे संकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने शिंदे गट तयारीला लागला आहे.

 

आणि अनुराधा चव्हाण यांच्यासाठी हरिभाऊ बागडे हे जणू विधानसभेचे दार ठरले.

 

पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या, त्यात समर्थकांची असलेली वाणवा, यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचे विलास औताडे बाजी मारतील, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र हरिभाऊ बागडे आणि भाजपसाठी म्हणून कार्यकर्त्यांनी अनुराधा चव्हाण यांना निवडून आणले. अवघ्या ३२ हजार मतांनी विलास औताडे हरले. शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार रमेश पवार यांचा होरा चुकला. कारण फुलंब्री मतदारसंघात हरिभाऊ बागडे यांची लोकप्रियता इतकी आहे, की त्यांनी एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला जरी निवडून आणा, असे आवाहन केले असते तरी तो निवडून आला असता. पवार यांच्या कृत्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवले. ११ महिने पद रिक्तच होते.

 

विधानसभा निवडणुका महायुती करून होत असताना शिंदे गटाचे तत्कालिन जिल्हाप्रमुख रमेश पवार यांनी फुलंब्री मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी निवडणुकीत अनुराधा चव्हाण या हरिभाऊ बागडे यांच्या प्रभावामुळे निवडून येतीलच, याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे पवार हेही रिंगणात उतरले होते. पण बागडे यांचा करिष्मा चालला आणि अनुराधा चव्हाण यांच्यासाठी हरिभाऊ बागडे हे जणू विधानसभेचे दार ठरले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments