बुद्ध लेणी बचाव आदेशाला केराची टोपली; जिल्हाधिकारी आदेशाला न जुमानता भूमाफियांचा उच्छाद !
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)
जागतिक वारसा स्थळ असलेल्या बुद्ध लेणी परिसरासाठी नुकताच जिल्हाधिकाऱ्यांनी संरक्षणाचा आदेश काढला होता. मात्र हा आदेश प्रत्यक्षात केवळ कागदावरच राहिला असून, भूमाफियांनी त्याला केराची टोपली दाखवत मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खनन आणि प्लॉटिंग सुरुच ठेवले आहे. लेणी परिसरात बेकायदेशीरपणे कंपाउंड मारण्याचे काम मोठ्या दबंगाईने सुरु असून प्रशासनाचे आदेश पायदळी तुडवले जात आहेत. वारसा संवर्धनाच्या दृष्टीने काढलेल्या आदेशाची अशा पद्धतीने उघड उघड अवहेलना होत असल्याने प्रशासनाची भूमिका
संशयास्पद ठरते आहे. इतिहास व संस्कृतीचे प्रतीक असलेल्या बुद्ध लेणीला या बेकायदेशीर कामामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. वारसा स्थळाचे संरक्षण करण्याची जबाबदारी असतानाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने भूमाफियांची दबंगाईच वाढली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, तात्काळ कठोर कारवाईची मागणी होत आहे. केवळ आदेश काढून न थांबता प्रत्यक्ष अंमलबजावणी करून दाखवा, असा थेट सवाल आता