मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

मस्साजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; स्वरूपानंद देशमुख विजयी

On: April 29, 2026 1:01 PM
Follow Us:
---Advertisement---

मस्साजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; स्वरूपानंद देशमुख विजयी

 

बीड | प्रतिनिधी, दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क

 

बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायत सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल लागला असून स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव करत ग्रामस्थांचा कौल आपल्या बाजूने वळवला.

 

या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. देशमुख कुटुंबीयांकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, गावकऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप करत स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी दाखल केली आणि निवडणूक रंगतदार झाली.

 

प्रचारादरम्यान आश्विनी देशमुख यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या नावावर भावनिक मुद्दा पुढे केला, तर स्वरूपानंद देशमुख यांनी गावाच्या विकासाचा मुद्दा ठळकपणे मांडला. अखेर ग्रामस्थांनी विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने कौल दिला.

 

मतमोजणीनंतर स्वरूपानंद देशमुख यांनी तब्बल ९२ मतांनी विजय मिळवला असल्याचे स्पष्ट झाले.

 

 

 

पराभवाची भरपाई, आता मोठा विजय

 

मागील निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा संतोष देशमुख यांनी केवळ ९ मतांनी पराभव केला होता. मात्र, यावेळी त्यांनी त्याच कुटुंबातील उमेदवाराविरुद्ध लढत देत ९२ मतांनी विजय मिळवत पराभवाची भरपाई केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment