मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

हृदयद्रावक घटना! डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने महाराष्ट्र हळहळला

On: October 24, 2025 7:47 PM
Follow Us:
---Advertisement---

हृदयद्रावक घटना!

डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने महाराष्ट्र हळहळला

साताऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले.   वैद्यकीय क्षेत्रासाठी आणि समाजासाठी मोठा धक्का आहे. सुसाईड नोटमधील धक्कादायक खुलासे

डॉ. संपदा यांनी हातावर पेनाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये PSI गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी लिहिलं:

“माझ्या मृत्यूला PSI गोपाल बदने जबाबदार आहे, ज्याने ४ वेळा माझ्यावर अत्याचार केले. तसेच, पोलीस प्रशांत बनकर याने गेल्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला.”

 

 

सूत्रांनुसार, डॉ. मुंडे गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणातील वाद आणि त्यानंतर सुरू असलेली अंतर्गत चौकशी यामुळे त्या प्रचंड तणावात होत्या. एक पोस्ट मोर्टम रिपोर्ट पोलिसांना पाहिजे तसाच द्या असा दबाव संबंधित अधिकारी डॉ. मुंडे यांच्यावर होता याच दबावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पोलीस दलात खळबळ

या गंभीर आरोपांमुळे सातारा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. आता सर्वांचे लक्ष पोलिसांच्या तपासाकडे आणि दोषींवर होणाऱ्या कारवाईकडे लागले आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. डॉ. संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

या प्रकरणी न्याय मिळावा आणि सर्व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हीच मागणी.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment