मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

पिंपळवाडी-महालब्बा रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न; ग्रामस्थांची चौकशीची मागणी..

On: June 16, 2026 7:28 PM
Follow Us:
---Advertisement---

पिंपळवाडी–महालब्बा रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न; ग्रामस्थांची चौकशीची मागणी..

 

 

. दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या पिंपळवाडी–महालब्बा रस्त्याच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अधिकृत माहितीनुसार या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी मे. एस.आर.एल. कन्स्ट्रक्शन प्रा. लि., जालगाव यांच्याकडे २०२८ पर्यंत आहे. मात्र देखभाल कालावधी सुरू असतानाच रस्त्यावर काही ठिकाणी खडी उघडी पडल्याचे व डांबरीकरण निकृष्ट झाल्याचे आरोप होत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून दुचाकीस्वारांमध्ये अपघाताची भीती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात रस्त्याची स्थिती आणखी खराब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य आणि प्रत्यक्ष डांबरीकरणाची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच कामात त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, शासनाकडून लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही रस्त्याबाबत तक्रारी समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. “२०२८ पर्यंत देखभालीची जबाबदारी असताना २०२६ मध्येच रस्ता खराब कसा?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment