ऐन मतदानाच्या आदल्या रात्री महायुतीत जुंपली! भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत पैसे सापडताच, निलेश राणेंचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या
Malvan Nagarparishad Election Update : मालवणमध्ये
मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान मालवण पोलिसांना एका कारमध्ये काही रोख रक्कम सापडली. ही कार देवगड भाजपचे तालुका अध्यक्ष महेश नारकार यांची असल्याचं तपासात समोर आलं त्यानंतर पोलिसांनी ही कार अधिक तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये आणली.
Malvan Nagarparishad Election Update : राज्यभरात
आज (ता.02) नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी मालवणध्ये नाकाबंदीत एका कारमध्ये तब्बल दीड लाखांची रोकड सापडली आहे. सापडलेली कार भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याची असल्याचं समोर आलं आहे.
त्यामुळे शिंदेंया शिवसेनेचे आमदार निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमदार राणे निलेश यांनी निवडणुकीच्या आदल्या रात्री भाजपकडून पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप करत थेट मालवण पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या घातला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या आदल्या रात्री मालवणमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मालवणमध्ये मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान मालवण पोलिसांना एका कारमध्ये काही रोख रक्कम सापडली. ही कार देवगड भाजपचे तालुका अध्यक्ष महेश नारकार यांची असल्याचं तपासात समोर आलं त्यानंतर पोलिसांनी ही कार अधिक तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये आणली
तर निलेश राणे यांनी भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकर, आदित्य पाताडे आणि बाबा परब यांच्याकडे ही रोकड सापडल्याचा आरोप करत आपण पोलीस ठाण्यात जाईपर्यंत पोलिसांनी तक्रारही दाखल केली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यासाठी सिंधुदुर्ग भाजप उपाध्यक्षांनी पोलिसांसोबत तडजोड केल्याचा गंभीर आरोप देखील राणे यांनी यावेळी केला..
