शहरातील तीन आठवडी बाजार मनपा करणार बंद
आयुक्तांची भूमिका : वाहतूक कोंडी, अपघात, अस्वच्छतेचे कारण
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
शहरातील तीन आठवडी बाजार मनपा करणार बंद
॥ आयुक्तांची भूमिका : वाहतूक कोंडी, अपघात, अस्वच्छतेचे कारण
छत्रपती संभाजीनगर शहरात
महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वी सुरू असलेले चिकलठाणा, जाफरगेट आणि पौरबाजार (शहानुरमियों दर्गा) येथील आठवडी बाजार बंद करण्याची घोषणा मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी बुधवारी (दि.२५) अर्थसंकल्प सादर करताना केली. आठवडी बाजारामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि वादविवाद होऊन मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता शहरात आठवडी बाजार ही संकल्पना मोडीत निघणार आहे.
महापालिका प्रशासनाने २०२६-२७ या
आर्थिक वर्षांसाठी अंदाजपत्रक तयार करून आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांच्याकडे सादर केले. अंदाजपत्रक सादर करताना आयुक्तांना विविध विभागांवर होणाऱ्या जमाखर्चाचा तपशीलदेखील मांडला. महापालिका स्थापन होण्यापूर्वी सुरू असलेले आठवडी बाजार बंद करण्याची घोषणा त्यांनी केली. शहरात चिकलठाणा, जाफरगेट आणि शहानुरमिया दर्गा भागात पीर बाजार म्हणून आठवडी बाजार भरवला जातो. या आठवडी बाजारात फिरत्या विक्रेत्यांसह परिसरातील शेतकरीदेखील भाजीपाला, धान्य घेऊन विक्रीसाठी येतात. दर आठवड्यात प्रत्येक बाजारात साधारणपणे २५ ते ५० लाख रुपयांची उलाढाल होते. आठवडी बाजारात खरेदीसाठी शहरातील नागरिक मोठी गर्दी करतात. ताजा भाजीपाला स्वस्तात मिळत असल्याने आठवडाभराचा भाजीपाला, फळे, कडधान्य,
मंडईच्या गाळ्यांमध्ये भाजी बाजार
त्याऐवजी मनपाच्या विविध ठिकाणी उभारण्यात
आलेल्या भाजी-मंडईमध्ये अस्तित्वात असलेल्या गाळ्यांमध्ये भाजी बाजार भरविण्यास मान्यता देण्यात येणार आहे.
2 त्यासाठी अस्तित्वात असलेल्या भाजी मंडईची डागडूजी करून गरजेनुसार नवी गाळ्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे यानंतर रस्त्यावर आठवडी बाजार भरवणे, रस्ता दुभाजकांमध्ये व्यवसाय करण्यास संपूर्णपणे प्रतिबंध घालण्यात येणार असल्याचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले.
धान्य घेऊन जातात. या आठवडी बाजारामुळे वाहतूक कोंडी होत असून अपघात होत असल्याने वादविवाद होतात. तसेच बाजाराच्या








